
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या वैद्यकीय अधिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर डॉ. विशाल रेड्डी यांचे रिक्षा संघटनेकडून स्वागत करण्यात आले. यावेळी शरद जामदार, राजू धारपवार, योगेश सावंत, धैर्यशील शिर्के, गिरगोल डिसोझा, पवन मेहतर, किरण कांबळी आदी उपस्थित होते. डॉ. रेड्डी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.











