LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील संशयास्पद जमीन खरेदी प्रकरण अखेर एसआयटीकडे

भाजप कार्यकर्ता भूषण आंगाचेकर यांच्या पाठपुराव्याला यश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 08, 2026 13:17 PM
views 137  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीयांकडून संशयास्पद पद्धतीने झालेल्या जमीन खरेदी, खोट्या शेतकरी प्रमाणपत्रांचा कथित वापर आणि नियमबाह्य व्यवहारांविरोधात भाजप कार्यकर्ता भूषण आंगाचेकर यांनी सातत्याने शासनाकडे निवेदने, तक्रारी आणि पाठपुरावा केला होता. या विषयाची अखेर शासनाने गंभीर दखल घेत एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश दिल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे संशयास्पद जमीन व्यवहार करणारे, खोटी कागदपत्रे सादर करणारे आणि अशा व्यवहारांना मदत करणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. एसआयटी चौकशीत सत्य बाहेर येईल आणि दोषींना कायद्यापुढे उत्तर द्यावे लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या निर्णयाबद्दल महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री मा. नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे भूषण आंगाचेकर यांनी आभार मानले आहेत.

“सिंधुदुर्गची जमीन कोणाच्याही बापाची जहागीर नाही. कायद्याचे उल्लंघन करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. हा लढा इथे थांबणार नसून सिंधुदुर्गच्या हितासाठी पुढेही सुरू राहणार आहे,” असे श्री. भूषण आंगाचेकर यांनी ठामपणे सांगितले.