LIVE UPDATES

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 01:33 PM
views 86  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव 'डिफरंट बिट्स, वन स्पोर्टींग स्पिरिट' या संकल्पनेखाली आज दिमाखात संपन्न झाला. विविध क्रीडा स्पर्धा, आकर्षक संचलन आणि प्रात्यक्षिकांमुळे  महोत्सवात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. 

यावेळी सचिव संजीव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सैनिक स्कूल प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई आणि उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक उपस्थित होत्या.

स्वागतगीत आणि मशाल संचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध संचलन आणि कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली. पूर्वप्राथमिक ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मनोरंजक खेळ आणि मैदानी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये लाठी-काठी आणि मल्लखांबाची प्रात्यक्षिके विशेष आकर्षण ठरली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

मार्च पास्ट, हाऊस ड्रिल तसेच ‘बेस्ट ऍथलेटिक बॉय’ आणि ‘बेस्ट ऍथलेटिक गर्ल’ हे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. रस्सीखेच स्पर्धेतील सहावी व आठवीच्या संघातील अंतिम सामना रंगतदार ठरला. सर्वसाधारण हाऊस चॅम्पियनशिपमध्ये ऑरेंज हाऊस (अग्नी हाऊस) यांनी विजेतेपद, तर यलो हाऊस (वायू हाऊस) यांनी उपविजेतेपद पटकावले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रेसीडा डिसोझा, ज्योती लोखंडे व प्रशांती चव्हाण यांनी केले. प्राची कुडतरकर यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना रुजवणारा हा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांना नवीन सत्रासाठी ऊर्जा देणारा ठरला.


ताजी बातमी

View all

chiplun-indian-pangolin-rescue-khersheth.jpg
Chiplun Pangolin Rescue : खेरशेतमध्ये दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान
November 28, 2026
Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक
November 28, 2026
Karivade Maruti Temple built on a giant rock beside a river in Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra.
Karivade Maruti Temple : नदीच्या पात्रात अजस्त्र खडकावर उभं मारुती मंदिर
November 28, 2026
vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
District level chess tournament
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात ८ डिसेंबरला जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
November 28, 2026
५० मीटर भालाफेकीत सिद्धार्थ जठारची सुवर्णभरारी
November 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
वेंगुर्ल्यात रंगणार रोटरीचा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव
November 27, 2026