LIVE UPDATES

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात ८ डिसेंबरला जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 07:08 PM
views 64  views
District level chess tournament

वैभववाडी : आनंदीबाई रावराणे यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (ता. ८) डिसेंबरला जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे.

ही स्पर्धा इयत्ता पहिली ते सातवी आणि इयत्ता आठवी ते बारावी अशा दोन गटांत घेतली जाणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

चौथ्या ते सहाव्या क्रमांकाच्या खेळाडूंना उत्तेजनार्थ पदके, तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी ५० रुपये प्रवेश शुल्क असून ६ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

chiplun-indian-pangolin-rescue-khersheth.jpg
Chiplun Pangolin Rescue : खेरशेतमध्ये दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान
November 28, 2026
Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक
November 28, 2026
Karivade Maruti Temple built on a giant rock beside a river in Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra.
Karivade Maruti Temple : नदीच्या पात्रात अजस्त्र खडकावर उभं मारुती मंदिर
November 28, 2026
vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
५० मीटर भालाफेकीत सिद्धार्थ जठारची सुवर्णभरारी
November 28, 2026
भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
November 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
वेंगुर्ल्यात रंगणार रोटरीचा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव
November 27, 2026