LIVE UPDATES

५० मीटर भालाफेकीत सिद्धार्थ जठारची सुवर्णभरारी

दळवी महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच विद्यापीठस्तरीय सुवर्णपदक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 28, 2026 03:54 PM
views 57  views

तळेरे : मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या सिद्धार्थ यशवंत जठार याने भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ५० मीटर अंतरावर भालाफेक करीत त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. महाविद्यालयाच्या क्रीडा इतिहासात विद्यापीठस्तरीय भालाफेक स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक मिळविण्याचा मान सिद्धार्थने मिळविला.

यापूर्वी कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेतही सिद्धार्थने सुवर्णपदक पटकावले होते. आंतरविभागीय स्पर्धेतही या यशाची पुनरावृत्ती करीत त्याने महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदविली.

सिद्धार्थच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे समन्वयक श्रीपाद वेलिंग यांनी त्याचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना योग्य संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, असे त्यांनी सांगितले. सिद्धार्थच्या कामगिरीतून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि क्रीडा तसेच विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सिद्धार्थ महाविद्यालयात तृतीय वर्ष बीएएफ.चे शिक्षण घेत असून, त्याला क्रीडा विभागप्रमुख प्रा. विशाल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. हेमंत महाडिक यांचे प्रोत्साहन आणि महाविद्यालयाचे सातत्यपूर्ण पाठबळही त्याच्या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरले. महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक श्री. विनायक दळवी, व समन्वयक यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सिद्धार्थचे अभिनंदन केले.


ताजी बातमी

View all

chiplun-indian-pangolin-rescue-khersheth.jpg
Chiplun Pangolin Rescue : खेरशेतमध्ये दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान
November 28, 2026
Mumbai-Goa Highway Accident : कोंडमळा येथे उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक
November 28, 2026
Karivade Maruti Temple built on a giant rock beside a river in Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra.
Karivade Maruti Temple : नदीच्या पात्रात अजस्त्र खडकावर उभं मारुती मंदिर
November 28, 2026
vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
संबंधित बातम्या

View all

vedant-pophale-modern-pentathlon-state-level-selection.jpg
Vedant Pophale Modern Pentathlon : वराडकर हायस्कूलचा वेदांत पोफळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
November 28, 2026
District level chess tournament
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात ८ डिसेंबरला जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
November 28, 2026
भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
November 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
वेंगुर्ल्यात रंगणार रोटरीचा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव
November 27, 2026