LIVE UPDATES

वेंगुर्ल्यात रंगणार रोटरीचा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव

दीडशे रोटेरीयन होणार सहभागी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 27, 2026 02:41 PM
views 78  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील कॅम्प मैदानावर उद्या (२८ नोव्हेंबर) शनिवारपासून रोटरी डिस्ट्रिक्ट स्पोट्र्स रंगणार आहेत. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या क्रीडा महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, धारवाड, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, चिपळूण याठिकाणचे मिळून सुमारे दीडशे रोटेरियन सहभागी होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन क्लबचे प्रेसिडेंट अॅड.प्रथमेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने २८ व २९ नोव्हेंबर या कालावधीत वेंगुर्ला शहरातील कॅम्प मैदानावर रोटरी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स २०२६ या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

याबाबत माहिती देण्यासाठी आज शुक्रवारी रोटरी कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष प्रथमेश नाईक, सेक्रेटरी मुकुल सातार्डेकर, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्सचे अध्यक्ष व क्लबचे पास्ट प्रेसिडेंट योगेश नाईक, नगराध्यक्ष तसेच स्पोर्ट्स हेड दिलीप गिरप, डॉ.राजेश्वर उबाळे, रोटरी क्लबचे आगामी अध्यक्ष दादा साळगावकर, अनमोल गिरप, पंकज शिरसाठ आणि नगरसेवक प्रणव वायंगणकर उपस्थित होते.

या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, बॅटमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, स्विमिंग आदी क्रीडा प्रकार खेळविले जाणार आहेत. या क्रीडा प्रकारांचा थरार पहाण्यासाठी क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहनही अॅड.नाईक यांनी केले. गेले दोन वर्षांपूर्वी अशाप्रकारचे स्पोर्टस् वेंगुर्ला येथे झाले होते.

त्यावेळी नियोजनाची सर्व जबाबदारी नगराध्यक्ष दिलीप गिरप, राजू वजराटकर यांच्यासह सर्व रोटरी क्लबच्या सदस्यांनी घेतली होती. त्याचे नियोजन उत्तमरित्या झाले होते. त्यावेळचे नियोजन पाहून आत्ताचे डिस्ट्रिक ३१७०चे डिस्ट्रिक्ट गर्व्हनर डॉ.लेनी डिकॉस्टा यांनी आपल्या कार्यकाळात वेंगुर्ला येथेच हा महोत्सव घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज पुन्हा एकदा वेंगुर्ला रोटरी क्लबला जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव भरविण्याचा मान मिळाला असल्याची माहिती योगेश नाईक यांनी दिली.

रोटरीचा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव हा कोल्हापूर, पुणे, गोवा अशा मोठ्या शहरांमध्ये घेतला जातो. वेंगुर्ल्यासारख्या छोेट्या गावाला हा मान मिळणे आम्ही आमचे भाग्य समजतो. यापूर्वी आम्ही या महोत्सवामध्ये सहभागी झालो होतो.

परंतु, एकाच ठिकाणी सर्व क्रीडा प्रकारांची मैदाने नसतात. मात्र, वेंगुर्ला हे असे केंद्र आहे जे एकाच ठिकाणी सर्व क्रीडा प्रकारांची मैदाने आहेत. त्यामुळे हा मान आम्हाला मिळाला. वर्षभर सगळे रोटेरियन आपापल्या नोकरी व्यवसायात व्यस्त असतात. त्यातून त्यांना विरंगुळा मिळावा हा या महोत्सवामागचा उद्देश असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.

या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ९ वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ला मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, डिस्ट्रिक्ट गर्व्हनर डॉ.लेनी डिकॉस्टा, जिल्हापरिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्ष दिलीप गिरप, अॅडमिन फ्लोरी फर्नांडिस. डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी  रो. प्रणय तेली, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, रो.डॉक्टर विद्याधर तायशेटे, असिस्टंट गव्हर्नर रो.अभिषेक माने उपस्थित राहणार आहेत.


ताजी बातमी

View all

देवगडमध्ये व्यावसायिकांसाठी एफडीए परवाना नूतनीकरण विशेष कॅम्प
November 27, 2026
Kiran Waghmare Honoured for Sagarkavach Coastal Security Exercise
देवगडचे मत्स्यपरवाना अधिकारी किरण वाघमारे यांचा राज्यस्तरीय गौरव
November 27, 2026
Sawantwadi Moti Lake Pollution Fine
Sawantwadi Moti Lake Pollution : मोती तलावात पावडर टाकल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई
November 27, 2026
Archana Sawant Teachers Council Appointment
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकार्यवाहपदी अर्चना सावंत यांची निवड
November 27, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg cross country competition : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा १३ डिसेंबरला
November 27, 2026
Ratnagiri Athletes Prasad Devstali and Ankita Prabhu-Parkar at HYROX
Ratnagiri HYROX Athletes : प्रसाद देवस्थळी आणि अंकिता प्रभू-पाटकर यांची ऐतिहासिक कामगिरी
November 27, 2026
India vs New Zealand 2nd Test Day 1 score, Tom Blundell and Tom Latham batting in Christchurch
न्यूझीलंडची पहिल्या दिवसअखेर ५ बाद २४६ धावसंख्या; ब्लंडेल-लॅथमची अर्धशतके, भारतीय गोलंदाजांची प्रभावी कामगिरी
November 27, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Powerlifting Championship : पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत हीना सारंगचे यश
November 26, 2026