
सावंतवाडी : सिंधू रनर्स आणि स्पोर्ट्स फाउंडेशन, सावंतवाडी प्लेस बुटीक आर्ट हॉटेल तसेच सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी ‘सिंधू यंग चॅम्पियन्स रन’ रविवार, २७ डिसेंबर २०२६ रोजी सावंतवाडी राजवाडा येथे आयोजित करण्यात आली आहे. लहान वयातील मुलांमध्ये धावण्याची आवड निर्माण करण्यासह शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत वयोगटानुसार चार प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धा होणार आहेत. १६ ते १९ वयोगटासाठी १० किलोमीटर, १३ ते १६ वयोगटासाठी ५ किलोमीटर, १० ते १३ वयोगटासाठी ३ किलोमीटर आणि ७ ते १० वयोगटासाठी १.५ किलोमीटर अशा स्पर्धांचा समावेश आहे.
स्पर्धेच्या नोंदणीसाठी १० किलोमीटरसाठी ८५० रुपये, ५ किलोमीटरसाठी ७५० रुपये, ३ किलोमीटरसाठी ६५० रुपये, तर १.५ किलोमीटरसाठी ५५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सर्व नोंदणीकृत सहभागी धावपटूंना टी-शर्ट, पदक आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून स्पर्धेदरम्यान पाणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. स्पर्धेनंतर अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार १० किलोमीटरसाठी सकाळी ५.३० वाजता रिपोर्टिंग व ६ वाजता सुरुवात, ५ किलोमीटरसाठी ६ वाजता रिपोर्टिंग व ६.३० वाजता सुरुवात, ३ किलोमीटरसाठी ६.३० वाजता रिपोर्टिंग व ७ वाजता सुरुवात, तर १.५ किलोमीटरसाठी ७ वाजता रिपोर्टिंग व ७.३० वाजता सुरुवात होणार आहे.
इच्छुकांनी Instagram आणि Facebook वरील ‘Sindhu_Runners_07’ या पेजला भेट देऊन किंवा www.Sindhurunners.com या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणीसाठी कार्यक्रमाच्या जाहिरात पोस्टरवर QR कोडही उपलब्ध आहे. नोंदणीची अंतिम तारीख ५ डिसेंबर २०२६ असून पालकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी वेळेत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गतवर्षीच्या स्पर्धेत सुमारे ३४० मुलांनी सहभाग नोंदविला होता. यंदा ५०० हून अधिक बालधावपटू सहभागी होतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून धावण्याच्या व्यायामप्रकाराबाबत जनजागृती करणे आणि जिल्ह्यातील व राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सिंधू रनर्स टीमच्या माहितीनुसार, संस्थेने यापूर्वी सावंतवाडी, मालवण, गोवा तसेच विविध ठिकाणी अनेक महत्त्वपूर्ण धावस्पर्धांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांमुळे स्थानिक धावपटूंना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळविण्याची संधी उपलब्ध होत आहे.
अधिक माहितीसाठी ओंकार पराडकर (९४२०३०७१८७), डॉ. स्नेहल गोवेकर (९४२२३७३९२२), डॉ. सोमनाथ परब (९७६४२३५२७६), डॉ. प्रशांत भस्म (९४२२९६३७१२), डॉ. प्रदीप वेगुर्लेकर (९४२०७४२४४०), भूषण बांदेलकर (९५२७३८७७२७) आणि सुजाता रासकर (९६८६६०११५६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








