LIVE UPDATES

देवगडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथमच सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

भारतीय पोस्टकार्डवर ज्येष्ठ नागरिक मांडणार समस्या आणि उपाय; प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपयांची पारितोषिके
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 07:42 PM
views 18  views

देवगड : ज्येष्ठ नागरिकांच्या सुंदर हस्ताक्षराला व्यासपीठ मिळवून देण्यासह त्यांच्या मनातील समस्या आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी देवगडमध्ये प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधू ग्रामविकास फाउंडेशन (रजि.) आणि उमा बर्वे लायब्ररी, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची संकल्पना हस्ताक्षर सुधारणा विषयात भारतातील पहिले डॉक्टरेट मिळविणारे डॉ. गणेश ऊर्फ भाई बांदकर यांची आहे.

पूर्वीच्या पिढीमध्ये सुंदर हस्ताक्षराला विशेष महत्त्व दिले जात होते. त्यामुळे त्या काळातील अनेकांचे हस्ताक्षर वळणदार आणि सुबक असायचे. मात्र, कालांतराने सुंदर हस्ताक्षराचा आग्रह कमी होत गेला. पूर्वीच्या पिढीतील ज्येष्ठ नागरिकांचे सुंदर हस्ताक्षर नव्या पिढीला पाहता यावे, तसेच त्यांच्या मनातील प्रश्न आणि विचार समाजासमोर यावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या स्पर्धेसाठी सहभागी ज्येष्ठ नागरिकांनी केवळ भारतीय पोस्टकार्डवर लेखन करायचे आहे. 'ज्येष्ठ नागरिकांची एखादी समस्या आणि त्यावरील उपाय' हा लेखनाचा विषय आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे सुंदर हस्ताक्षर पाहण्याची संधी मिळण्याबरोबरच त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या आणि त्यावर त्यांनी सुचविलेले उपायही समोर येणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय १० उत्तेजनार्थ पारितोषिके आणि १०० सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आशापुरी रेसिडेन्सीचे श्री. शिरीष शिरसाट हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.

स्पर्धेचे नियम सोपे असून, पोस्टकार्डच्या मोठ्या मोकळ्या बाजूवर संबंधित समस्या आणि त्यावरील उपाय लिहायचे आहेत. दुसऱ्या बाजूला स्पर्धकाचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आणि जन्मतारीख नमूद करायची आहे. स्पर्धकांनी आपले पोस्टकार्ड २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत मार्गदर्शक ऑफिस, सातपायरी, जामसंडे किंवा उमा बर्वे लायब्ररी, देवगड येथे पोहोचवावे.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता देवगड येथील उमा बर्वे लायब्ररीशेजारील स्नेहवर्धक मंडळ सभागृहात होणार आहे. यावेळी हस्ताक्षरावर आधारित 'अक्षरयात्रा' हा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. 'सुधारणा ते अक्षरावरून स्वभावदर्शन' अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असणार आहे.

हस्ताक्षर सुधारणेसाठी महाराष्ट्रभर विनामूल्य कार्यशाळा घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्या स्वर्गीय सौ. गीतांजली गणेश बांदकर यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले विचार, समस्या आणि उपाय प्रभावीपणे मांडावेत, असे आवाहन सिंधू ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कृष्णा बांदकर, उमा बर्वे लायब्ररीचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर आणि मुख्य प्रायोजक शिरीष शिरसाट यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

पणजी-दोडामार्ग-तिलारी घाट मार्गे कोल्हापूर-पुणे मार्गावर कदंबा बससेवा सुरू करा
November 23, 2026
Yuvraj Lakhamraje Bhosale addressing a press conference in Sawantwadi about the multispeciality hospital project and city development.
Sawantwadi Multispeciality Hospital : नगराध्यक्षा म्हणून श्रद्धाराजे सक्षम
November 23, 2026
Dr Raghunath Mashelkar addressing the Naik Maratha Mandal centenary celebration in Mumbai.
‘E = F’ हे समीकरण न्यूटन आणि आइन्स्टाईन यांच्या समीकरणांपेक्षाही मोठे
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : सावंतवाडीत २७ डिसेंबरला सिंधू यंग चॅम्पियन्स रन
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

पणजी-दोडामार्ग-तिलारी घाट मार्गे कोल्हापूर-पुणे मार्गावर कदंबा बससेवा सुरू करा
November 23, 2026
Yuvraj Lakhamraje Bhosale addressing a press conference in Sawantwadi about the multispeciality hospital project and city development.
Sawantwadi Multispeciality Hospital : नगराध्यक्षा म्हणून श्रद्धाराजे सक्षम
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगडात ३ डिसेंबरला पहिली आंबा परिषद
November 23, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगड हायस्कूलात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित
November 23, 2026