LIVE UPDATES

Sawantwadi News : राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकरचे यश

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 22, 2026 02:06 PM
views 54  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सिंधुदुर्ग : तिसवाडी बुद्धिबळ असोसिएशनने पणजी, गोवा येथे आयोजित केलेल्या एक लाख रुपये पारितोषिके असलेल्या राष्ट्रीय ब्लिट्ज रेटिंग बुद्धिबळ  स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकर याने उत्कृष्ट खेळ केला. या स्पर्धेत बाळकृष्णने बावीसावा क्रमांक मिळवला. एक ग्रँडमास्टर आणि चार इंटरनॅशनल मास्टर्ससोबत भारतातील जवळपास दोनशे खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, चिदानंद रेडकर, पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.

बाळकृष्णला स्पर्धेत ग्रँडमास्टर राॅय सप्तर्षी चौधरी यांच्याविरुदध टाॅप टेबलवर खेळण्याची संधी मिळाली. बाळकृष्णने अकरा राऊंड्समध्ये सहा राऊंड्स जिंकून आणि तीन राऊंड्स बरोबरीत सोडवून साडेसात गुण केले आणि बावीसावा क्रमांक पटकावला.

त्याने आपले रेटिंग पाॅईंट्स वाढवले. बाळकृष्णला रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. पुष्कर केळूसकर याने तब्बल सहा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर विजय मिळवून सहा गुण केले आणि ब्लिट्ज रेटिंग मिळवले. अथर्व वेंगुर्लेकर यांने सहा गुण, हर्ष राऊळ याने साडेपाच गुण आणि चिदानंद रेडकर याने पाच गुण केले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि सचिव सौ.स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

जामसंडेत बंद घरांना चोरट्यांचे लक्ष्य
November 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : पत्रकार विजय गांवकर यांना मातृशोक
November 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Stray Dogs Solution Maharashtra : भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करा
November 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kudal News : तळकोकणातील जत्रोत्सवांना मोठ्या उत्साहात प्रारंभ
November 22, 2026
संबंधित बातम्या

View all

नीरजा पवारची बॅडमिंटन राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण झेप
November 21, 2026
Shubman Gill dismissed for 98 runs against New Zealand in Wellington Test
भारताची न्यूझीलंडवर ११८ धावांची भक्कम आघाडी; ९८ धावांवर गिल क्लीन बोल्ड, पडिक्कलही शतकापासून दूर
November 21, 2026
Henry Nicholls celebrates his century against India in the first Test match at Wellington.
भारताची सुरुवात दमदार, पण निकोल्स-फिलिप्सची शतकी भागीदारी! पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडची २४३ धावांपर्यंत मजल
November 19, 2026
Jasprit Bumrah celebrates after taking a wicket against New Zealand in Test cricket.
Jasprit Bumrah Test Wickets : कसोटीतील टॉप १० गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहचा प्रवेश
November 19, 2026