LIVE UPDATES

Sawantwadi Kankavli Long Run : सावंतवाडी ते कणकवली 50 किमी लॉन्ग रन

स्वराज्य फिजिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 23, 2026 04:00 PM
views 88  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सावंतवाडी : स्वराज्य फिजिकल अकॅडमी, सावंतवाडी यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सहनशक्ती, जिद्द, चिकाटी आणि क्रीडाशिस्त निर्माण करण्याच्या उद्देशाने 'Long Run Target With Personal Best – 50 KM' या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी ते कणकवली या मार्गावर २१ नोव्हेंबर रोजी रात्री ठीक ११.३० वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. ही स्पर्धा २२ नोव्हेंबर रोजी पार पडली.

या स्पर्धेमध्ये अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी धावणे आणि नॉनस्टॉप सायकलिंग अशा विविध प्रकारांत आपापली निर्धारित अंतराची उद्दिष्टे पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी केली.

 ५० किमी लॉन्ग रनमध्ये हर्ष रवींद्रनाथ गोसावी – इयत्ता ९ वी, राणी पार्वतीदेवी माध्यमिक विद्यालय – ५० किमी पूर्ण केले. विनीत शंकर परब – इयत्ता १२ वी (Arts B), राणी पार्वतीदेवी उच्च माध्यमिक विद्यालय – ४५ किमी पूर्ण, सर्वेश गावडे (करिवडे) – ४० किमी पूर्ण, पियुष सुहास जाधव (कोलगाव) – ३५ किमी पूर्ण, आर्यन केळजी – ३५ किमी पूर्ण केले.

नॉनस्टॉप सायकलिंग व रनिंगमध्ये मुलींनी उल्लेखनीय कामगिरी केली. प्रथम क्रमांक साक्षी सुहास कापडोस्कर ३० किमी नॉनस्टॉप सायकलिंग, २० किमी नॉनस्टॉप रनिंग, द्वितीय क्रमांक रेणुका विजय गवळी खेमराज मेमोरियल माध्यमिक विद्यालय ३५ किमी नॉनस्टॉप सायकलिंग, १५ किमी नॉनस्टॉप रनिंग तसेच लावण्या राजन कुंभार (जनता माध्यमिक विद्यालय, तळवडे) – नॉनस्टॉप सायकलिंग, तन्वी गवस – ४० किमी सायकलिंग, खुशी नागेश खरात – ४५ किमी सायकलिंग, वेदिका घाडी – १६ किमी रनिंग व १५ किमी सायकलिंग केली.

U-14 गटातील दमदार कामगिरीत रेहान नसीम सारंग – ३७ किमी नॉनस्टॉप रनिंग, दुर्वा विनोद चव्हाण – सेंट उर्सुला स्कूल, वरवडे, कणकवली – २० किमी सायकलिंग. U-12 गटातील चिमुकल्यांची उल्लेखनीय कामगिरीत सावंतवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या क्षमतेचा उत्कृष्ट परिचय दिला. यात

शिवराज संतोष तळवणेकर – १८ किमी रनिंग, निर्मय संतोष रेडकर – १८ किमी रनिंग,आदित्य पियुष वेजरे – १८ किमी रनिंग केली. स्पर्धेचे खास आकर्षण अवघ्या ९ वर्षांचा आराध्य गोवेकर ठरला.

या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी कोलगाव येथील अवघ्या ९ वर्षांच्या आराध्य राजन गोवेकर याने केली. एवढ्या लहान वयात त्याने तब्बल १६ किमी नॉनस्टॉप रनिंग पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर लहान वयातही मोठी उद्दिष्टे गाठता येतात, हे आराध्याने दाखवून दिले.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी कणकवली पोलीस स्थानकाचे श्री. शिवगण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी अकॅडमीचे प्रशिक्षक हर्ष जाधव, कमिटीच्या उपाध्यक्षा मुस्कान सारंग, सचिव संतोष तळवणेकर, तसेच पालक वर्गातून अजरे, रेडकर, जाधव आणि वेदिका चव्हाण आदी उपस्थित होते. या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रशिक्षक श्री. हर्ष जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.