
सावंतवाडी : येथील मिलाग्रिस हायस्कूलची विद्यार्थिनी विधि सुनील मिशाळ हिची २० व्या सब-ज्युनियर (U-14) महाराष्ट्र रोलबॉल संघाच्या टॉप १२ खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या रोलबॉल संघात निवड होणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ती पहिली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. रोलबॉलच्या मैदानावर आपल्या चपळाईने आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.दिनांक २७ ते ३० डिसेंबर २०२६ या कालावधीत मेघालय येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत विधी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या संघातून खेळण्याची संधी मिळाल्याने तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिच्या या यशामध्ये मार्गदर्शक सागर सावंत, मिलाग्रिस हायस्कूलचे फादर रिचर्ड सालढाणा, क्रीडाशिक्षक हितेश मालंडकर आणि शेरॉन अल्फोन्सो यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.विधिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही तिने उत्कृष्ट कामगिरी करावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत .
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








