
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा सुपुत्र अभिषेक बच्चन यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 'गोल्डी ढिल्लोने' फेसबुकवर ही पोस्ट शेअर करुन धमकी दिली आहे. या धमकीमुळे चित्रपटसृष्टीत आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पोलीस या सोशल मीडिया पोस्टची सत्यता पडताळत असून बच्चन कुटुंबाची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
वृत्तसंस्था 'आयएएनएस'ने अहवालानुसार, गोल्डी ढिल्लोने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दावा केला आहे की, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचे दोन साथीदार विकास ठाकूर आणि दीपक सिंग यांना मुंबईतून अटक केली आहे. जे कोणी शीख समुदायाविरुद्ध बोलतील त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्याने दिला आहे.
अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांचा उल्लेख करत ढिल्लोने अत्यंत गंभीर धमकी दिली आहे. त्याने लिहिले आहे की, जरी हे दोघे बुलेटप्रूफ काचेच्या मागे किंवा कडेकोट सुरक्षेत लपले तरीही त्यांना शोधून गोळ्या घालून मारणार असा धमकीवजा इशारा गोल्डी ढिल्लोनने आपल्या पोस्टमधून दिला आहे. गोल्डी ढिल्लोने पोस्ट शेअर करुन कॅप्शनही दिलं आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये #JusticeOf1984 आणि #GoldyDhillonGroup यांसह विविध हॅशटॅगचा वापर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांना ईमेलद्वारे तीन वेगवेगळ्या बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्याच्या आदल्या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने विकास ठाकूर आणि दीपक सिंग या दोन संशयित हल्लेखोरांना अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोघे मुंबईतील अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' या निवासस्थानावर हल्ला करण्याचा कट रचत होते.
Gangster Goldy Dhillon claimed that Delhi Police Special Cell arrested his associates Vikas Thakur and Deepak Singh in Mumbai. In a social media post, he also issued threats against those speaking against the Sikh community and made threatening remarks directed at actors Amitabh Bachchan and Abhishek Bachchan
— IANS (@ians_india) November 16, 2026
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








