
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. बाली येथे झालेल्या बैठकीनंतर आयसीसी बोर्डाने ही घोषणा केली. ३८ वर्षीय जय शहा यांनी डिसेंबर २०२४ मध्ये पहिल्यांदा आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.
या प्रसंगी, आयसीसी अध्यक्ष जय शहा म्हणाले " आयसीसी बोर्डाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी अत्यंत सन्मानित झालो आहे. सर्व संचालकांचा माझ्यावरील निरंतर विश्वास आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आयसीसी अध्यक्ष म्हणून काम करणे हा एक विशेष अधिकार आणि मोठी जबाबदारी दोन्ही आहे. जगभरात क्रिकेटच्या हितासाठी आमच्या सर्व सदस्यांसोबत मिळून काम करण्यास मी कटिबद्ध आहे."
याबाबत आयसीसीने निवेदनात म्हटले आहे की, "बाली येथे झालेल्या बोर्ड आणि समितीच्या बैठकांदरम्यान आयसीसी संचालकांच्या प्रस्तावानंतर जय शहा यांची आयसीसी अध्यक्षपदी दुसऱ्या कार्यकाळासाठी बिनविरोध पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. हे जाहीर करताना आयसीसी बोर्डाला आनंद होत आहे. हा निर्णय त्यांच्या नेतृत्वावर बोर्डाचा असलेला विश्वास दर्शवतो आणि खेळासाठी एका महत्त्वाच्या टप्प्यावर सातत्य राखण्यास मदत करतो. हा असा काळ आहे जो जागतिक विस्तार, चाहत्यांच्या संख्येत वाढ आणि खेळाच्या भविष्यासाठी धोरणात्मक आराखडा पुढे नेण्यावर केंद्रित आहे."
Congratulations to Mr Jay Shah who has been reappointed unopposed for a second term as ICC Chairman at the global governing body's Board meetings in Bali. May you continue to achieve success in your endeavours and take cricket to greater heights across all spheres. @JayShah https://t.co/fHtdyLiua3
— BCCI (@BCCI) November 16, 2026
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








