LIVE UPDATES

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर

ग्रामस्थांसह जनावरांच्या जीविताला धोका : ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 05:34 PM
views 18  views

मालवण : आनंदव्हाळ- भोसलेवाडी येथे धामापूर-मालवण नळपाणी योजनेच्या पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, खोदलेले चर बुजविण्याचे काम अर्धवट स्थितीत ठेवल्याने परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या उघड्या चरांमध्ये ग्रामस्थ  तसेच मुकी जनावरे पडण्याची शक्यता निर्माण झाली असून, अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले चर व्यवस्थित बुजविणे आणि परिसर पूर्ववत करणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी हे चर दिसून येत नसल्याने पादचारी, वाहनचालक तसेच जनावरांसाठी हा परिसर धोकादायक बनला आहे.

एखादी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ, वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून खोदलेले चर बुजवावेत अशी मागणी होत आहे.


ताजी बातमी

View all

कोलगावात श्री देवी सातेरीचा 26 नोव्हेंबर रोजी भव्य वार्षिक जत्रोत्सव
November 17, 2026
Swimmers participating in the Sindhudurg Ocean Swimathon at Chivla Beach in Malvan, Maharashtra.
Sindhudurg Ocean Swimathon 2026 : मालवणात १९ व २० डिसेंबरला 'सिंधुदुर्ग ओशन स्विमथॉन' स्पर्धेचे आयोजन
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
संबंधित बातम्या

View all

कोलगावात श्री देवी सातेरीचा 26 नोव्हेंबर रोजी भव्य वार्षिक जत्रोत्सव
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा
November 17, 2026
न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
November 17, 2026