LIVE UPDATES

सिंधुदुर्गात '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे उत्साहात साजरा

वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान : शहीद जवानांच्या बलिदानाला भावपूर्ण अभिवादन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 05:04 PM
views 24  views

सिंधुदुर्ग : भारतीय सैन्यदलाच्या गौरवास्पद परंपरेचा साक्षीदार असलेला '१७ मराठा रुईवा परिवाराचा' ६४ वा रेजिंग डे सोहळा सिंधुदुर्गात संपन्न झाला. देशसेवेचा इतिहास, सैनिकांचे सर्वोच्च बलिदान आणि परिवारातील एकात्मतेची भावना या सोहळ्यात प्रकर्षाने जाणवली. या कार्यक्रमास ब्रिगेडियर चव्हाण आणि कर्नल किशोर भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर त्यांच्यासह भास्कर राणे यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. देशाच्या विविध भागांतून आलेले अधिकारी, आजी-माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि रुईवा परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात श्री गणपती स्तवनाने करण्यात आली. त्यानंतर श्री त्रिंबोली माता देवीचे पूजन व माल्यार्पण करून देवीचा आशीर्वाद घेण्यात आला. यानंतर उपस्थितांच्या साक्षीने दिमाखात रेजिंग डे सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यातील सर्वांत भावनिक आणि डोळ्यात पाणी आणणारा क्षण म्हणजे वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान सोहळा ठरला. देशाच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची आठवण करून देताना उपस्थितांच्या अंगावर काटा आला.

१९६५ आणि १९७१ च्या युद्धांत सहभागी झालेले शहीद नायक गोविंद गावडे यांच्या पत्नी श्रीमती सत्यवती गावडे आणि १९८८ मध्ये श्रीलंकेत देशासाठी शहीद झालेले श्री रामचंद्र गावडे यांच्या पत्नी श्रीमती सीताबाई गावडे यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

सिंधुदुर्ग रुईवा परिवाराचे अध्यक्ष शशिकांत गावडे, दशरथ चव्हाण आणि विलास राणे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या कृतीतून सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी बजावलेल्या प्रतिभावंत खेळाडूंचाही या व्यासपीठावरून सन्मान करण्यात आला.

कोकणच्या मातीतील या खेळाडूंच्या कर्तृत्वाचा गौरव करून युवा पिढीसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवण्यात आले. तसेच, परिवारातील ज्येष्ठ सदस्य, आजी-माजी सैनिक, सध्या सेवेत कार्यरत जवान आणि विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे कोकणच्या समृद्ध लोककला आणि संस्कृतीचे झालेले सादरीकरण ठरले. पारंपरिक नृत्य, लोककला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कोकणच्या मातीचा सुगंध आणि अस्सल परंपरेचे दर्शन पाहुण्यांना घडले. या सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळीच सांस्कृतिक रंगत लाभली.


प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत अशा मान्यवरांनी आपल्या व्हिडिओ संदेश आणि व्हॉइस मेसेजद्वारे पाठवलेल्या शुभेच्छा उपस्थितांना ऐकविण्यात आल्या, ज्यांमुळे उपरोक्तांच्या आनंदात आणखी भर पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद राणे आणि रेश्मा गुरुप्रसाद राणे यांनी अत्यंत प्रभावी, भावनिक आणि मुद्देसूद पद्धतीने पार पाडले.

प्रत्येक सन्मान सोहळ्याला साजेशी समर्पक शब्दरचना आणि कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्याचे सुंदर संयोजन यामुळे सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर चव्हाण, कर्नल किशोर भागवत तसेच भास्कर राणे आणि इतर मान्यवरांनी सिंधुदुर्ग परिवाराच्या उत्कृष्ट नियोजनाचे व व्यवस्थापनाचे कौतुक केले. 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहदेव राऊळ यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उपस्थित राहून सहकार्य करणारे सर्व अधिकारी, ज्येष्ठ मंडळी, आजी-माजी सैनिक, महिला भगिनी, युवक आणि रुईवा परिवारातील सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले. या संपूर्ण आयोजनात दौलत सुतार, अमित सुर्वे, संजय राऊळ, रवींद्र कुंदेकर, रमेश निवळे, वासुदेव दळवी, संजय तारी, चंद्रहास यादव, दीपक बागवे, शंकर नाईक, अशोक कडव, कांता सावंत यांच्यासह इतरांनी विशेष सहकार्य केले.


ताजी बातमी

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
Nitesh Rane Meets Deepak Kapoor Over Sindhudurg Flight Connectivity
Sindhudurg Navi Mumbai Flight Service : चिपी–नवी मुंबई विमानसेवा सुरू
November 17, 2026
Police investigating a bank robbery at a nationalised bank in Panbazar, Kudal, Sindhudurg, where a knife-wielding suspect was caught by locals.
Kudal Bank Robbery : कुडाळमध्ये भरदिवसा राष्ट्रीयकृत बँकेवर चाकूचा धाक दाखवून दरोडा
November 17, 2026
संबंधित बातम्या

View all

मालवणच्या आनंदव्हाळ-भोसलेवाडीत नळपाणी योजनेच्या कामानंतर उघडे चर
November 17, 2026
Bhuvanesh Malkar from Karivade village in Sawantwadi, who worked as a Prep Artist on the Ramayana and Toxic films through DNEG.
Ramayana Movie : 'रामायण’च्या भव्य निर्मितीत सावंतवाडीच्या सुपुत्राची झेप
November 17, 2026
न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
November 17, 2026
Onkar elephant in Nemale village of Sawantwadi as mango farmers raise concerns over crop damage and safety with the Sindhudurg Forest Department.
Omkar Elephant : ओंकार हत्तीला नेमळेतून त्वरित हटवा, अन्यथा फटाके फोडून हुसकावणार
November 17, 2026