
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डाने रविवारी २०३५ पर्यंतच्या प्रमुख पुरुष क्रिकेट स्पर्धांच्या वेळापत्रकास मंजुरी दिली. या योजनेनुसार भारत ९ ते २८ ऑक्टोबर २०२९ दरम्यान 'चॅम्पियन्स ट्रॉफी'चे आयोजन करेल. तसेच २०२१ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे सह-आयोजक म्हणून काम पाहिले. हा विश्वचषक ९ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०२९ या कालावधीत नियोजित आहे. २०२१ नंतरच्या स्पर्धांच्या यजमान देशांची घोषणा अद्याप झालेली नसली तरी या स्पर्धांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
आयसीसीचे हे वेळापत्रक २०२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकापासून सुरू होऊन २०३५ मधील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत विस्तारलेले आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी म्हटले आहे की, "आयसीसीच्या स्पर्धा आणि त्याशी संबंधित वेळापत्रक हे जागतिक क्रिकेट विश्वाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. यामुळे केवळ खेळातील स्पर्धात्मकताच वाढत नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वाला एक स्पष्ट दिशा आणि संदर्भही मिळतो."
ते पुढे म्हणाले, "खेळाडू आणि सदस्य देशांना या स्पर्धांची माहिती खूप आधी मिळणे किती महत्त्वाचे आहे हे आम्ही समजतो. यामुळे खेळाडूंच्या विकासाचे नियोजन करणे, हाय-परफॉर्मन्स प्रोग्राम्स राबवणे आणि एक सुव्यवस्थित क्रिकेट कॅलेंडर तयार करणे अधिक सोपे होईल."
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








