
सावंतवाडी : प्रशासनावर विश्वास ठेवायचा तरी किती वेळा आणि कितीदा फसवणूक सहन करायची ? असा सवाल करत कामळेवीर शाळेतील जवळपास १०० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न घेऊन पालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबावे आणि शाळेला शिक्षक मिळावा अशी मागणी पालकांनी केली. मात्र, प्रशासनाकडून आश्वासन देऊन फसवणूक केल्याचे ग्रामस्थांनी सांगत शासनाला इशारा दिला आहे.
पालकांचा आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाने परिपत्रक काढले. निवजे येथील श्री. जाधव यांना कामळेवीर शाळेत पाठविण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून पालकांनी आपले आंदोलन मागे घेतले. प्रशासनाच्या शब्दाला किंमत देत पालकांनी आपल्या मुलांना पुन्हा शाळेत पाठवले. मात्र, आता प्रशासनाने दिलेले आश्वासन हवेत विरले.
परिपत्रक काढून दिलेला शब्द पाळला गेला नाही आणि शिक्षकही शाळेत पाठवण्यात आले नाहीत. केवळ आंदोलन मागे घेण्यासाठी आश्वासनांचे गाजर दाखवायचे आणि आंदोलन मागे घेताच आपल्याच शब्दाला हरताळ फासायचा, हीच का प्रशासनाची कार्यपद्धती? असल्याची खंत व्यक्त केली गेली.
परिपत्रक काढून शिक्षक पाठवण्याचे लेखी आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? ते शिक्षक कामळेवीर शाळेत पाठवण्याचा निर्णय प्रत्यक्षात का राबवला गेला नाही? आंदोलन मागे घेण्यासाठी पालकांना आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी न करणे, ही कोणती प्रशासकीय नैतिकता?जवळपास १०० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी नेमकी कोण घेणार? असा सवाल ग्रामस्थांनी केले असून कामळेवीरच्या पालकांना आता केवळ आश्वासनांची गरज नाही.
त्यांना प्रत्यक्ष शिक्षक हवा आहे. आंदोलन मागे घेतले म्हणजे प्रश्न संपला असे नाही. शिक्षण विभागाने तातडीने दिलेला शब्द पाळावा आणि कामळेवीर शाळेला पदवीधर शिक्षक उपलब्ध करून द्यावा. शालेय शिक्षण समिती आणि सर्व पालक जोपर्यंत आपल्या शाळेला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








