LIVE UPDATES

सावंतवाडी नगरपरिषदेचा यशस्वी उपक्रम

महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणाची जोड
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 06:03 PM
views 22  views

सावंतवाडी : रोजगार निर्मितीच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचा सावंतवाडी नगरपरिषदेचा निर्णय आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरला आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून शहरातील युवती व महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध व्यावसायिक, तांत्रिक व नावीन्यपूर्ण प्रशिक्षण शिबिराचा दिमाखदार समारोप सोहळा नुकताच पार पडला. सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. 

दरम्यान, या उपक्रमामुळे सावंतवाडीच्या महिला आता खऱ्या अर्थाने कुटुंबाचा बळकट आधार बनत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, असे श्रीमंत शुभदादेवी भोसले म्हणाल्या. तसेच  सावंतवाडी नगरपरिषदेने महिलांना रोजगारक्षम बनविण्याचा घेतलेला निर्णय आज यशस्वी ठरला आहे. महिलांनी या प्रशिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. फॅशन डिझायनिंग, कॅटरिंग, कुकिंग तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहन चालविण्याचे हे प्रशिक्षण महिलांच्या भविष्यासाठी अत्यंत मोलाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, महिलांना सक्षम करण्याचा घेतलेला संकल्प आज पूर्णत्वास आल्याचे पाहून मन आनंदित झाले आहे. महिलांनी एकमेकींना सहकार्य करून व समजून घेऊन पुढे गेल्यास रोजगार निर्मितीमध्ये नक्कीच यश मिळेल. राजघराण्यातील संस्कारांची जोड आणि श्रीमंत शुभदादेवी भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन या वाटचालीस सतत लाभत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

तर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली भालेकर म्हणाल्या, महिला व युवतींच्या अंगात रोजगार निर्माण करण्याची प्रबळ हिंमत असल्यानेच हा उपक्रम हाती घेण्यात आला, जो आज यशस्वी ठरला आहे. हा उपक्रम महिलांच्या आगामी व्यावसायिक वाटचालीस दिशादर्शक ठरेल.

जागृत समाज विकास संस्था, कोल्हापूरचे प्रशिक्षक संदीप पवार यांनी सांगितले की, गेल्या ३३ वर्षांपासून ते प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. उद्योगामध्ये आवश्यक असणारी सहनशीलता महिलांमध्ये उपजतच असते, त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे सुलभ झाले. या प्रशिक्षणातून महिलांना रोजगाराच्या नवीन आणि हक्काच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

तसेच फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या साड्या नेसून एका आकर्षक फॅशन शोमध्ये सहभाग घेतला ज्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच कॅटरिंग आणि कुकिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी स्वप्नजा चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कोल्हापूरच्या जागृत विकास संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्या राणीसाहेब शुभदादेवी भोसले, नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. दिपाली भालेकर व इतर उपस्थितांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्यान समितीच्या सभापती मोहिनी मडगावकर, नगरसेविका निलम नाईक, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, सुनीता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, तसेच प्रशिक्षक सरकाश मुल्ला, सफिना बागवान, सारिका ठोंबरे, सपना चोडणकर आणि नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन परब यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसभापती सुनीता पेडणेकर यांनी मानले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी परवीन शेख यांनी प्रयत्न केले.


ताजी बातमी

View all

Parents protest over the teacher shortage at Kamalevir School in Sawantwadi, demanding a graduate teacher for nearly 100 students.
कामळेवीर शाळेतील शिक्षक नियुक्तीचे आश्वासन हवेतच
November 05, 2026
Sawantwadi Taluka Kabaddi Association announces boys and girls kabaddi selection trials for the Sindhudurg District Championship 2026.
Sawantwadi Kabaddi Selection : सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
November 05, 2026
Sawantwadi Indira Gandhi Commercial Complex where 138 shopkeepers have outstanding premium payments and most have pending monthly rent.
Sawantwadi News :व्यापारी संकुलातील तब्बल 138 गाळेधारकांकडे प्रीमियम थकीत
November 05, 2026
AISSEE 2027 Sainik School entrance examination notification for admission to Class 6 and Class 9 for the 2027-28 academic year.
Sainik School Admission 2027 : सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

Parents protest over the teacher shortage at Kamalevir School in Sawantwadi, demanding a graduate teacher for nearly 100 students.
कामळेवीर शाळेतील शिक्षक नियुक्तीचे आश्वासन हवेतच
November 05, 2026
Sawantwadi Indira Gandhi Commercial Complex where 138 shopkeepers have outstanding premium payments and most have pending monthly rent.
Sawantwadi News :व्यापारी संकुलातील तब्बल 138 गाळेधारकांकडे प्रीमियम थकीत
November 05, 2026
Sawantwadi Mayor Shraddharaje Bhosale celebrates Diwali with municipal employees and sanitation workers by distributing Diwali faral.
Sawantwadi Diwali Celebration : सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News :अनधिकृत मासेविक्री करताना आढळल्यास कारवाई
November 05, 2026