
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा लेखाजोखा गुरुवारी झालेल्या मासिक सभेत सादर करण्यात आला. या लेखाजोख्यातून पालिकेच्या उत्पन्नाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. संकुलातील एकूण १३८ गाळेधारकांपैकी केवळ २९ जणांनी मासिक भाडे भरले असून, सर्वच्या सर्व १३८ गाळेधारकांकडून प्रीमियमची रक्कमही थकीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे व्यापारी संकुलातील भाडे आणि प्रीमियम वसुलीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यापारी संकुलातील 138 पैकी ३ गाळे आणि १२ ओटे बंद आहेत. तर ३९ गाळेधारकांनी आपल्या गाळ्यांमध्ये भाडेकरू ठेवले आहेत किंवा कामगारांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू ठेवला आहे. तसेच 6 जणांकडे दोनपेक्षा अधिक गाळे असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे गाळ्यांचा प्रत्यक्ष वापर, भाडेकरूंची नियुक्ती आणि गाळ्यांच्या मालकी हक्कासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी गाळेधारकाने मासिक भाडे आणि प्रीमियम रक्कम भरली पाहिजे, नगरपालिका आपले उत्पन्न बुडवणार नाही असे स्पष्ट इशारा दिला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








