LIVE UPDATES

Goa Ironman 70.3 : गोवा आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉनमध्ये रत्नागिरीच्या दोन शिलेदारांची बाजी

डॉ. नितीन सनगर आणि राहुल भोसले यांनी ७ तास २ मिनिटांत पूर्ण केले आव्हान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 04, 2026 04:57 PM
views 84  views
Ratnagiri athletes Dr Nitin Sangaonkar and Rahul Bhosale successfully complete the Goa Ironman 70.3 Triathlon in 7 hours and 2 minutes.

रत्नागिरी : खडतर आणि आव्हानात्मक ‘गोवा आयर्नमॅन ७०.३’ (ट्रायथलॉन) ही स्पर्धा रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य व निश्चया वेलनेसचे संस्थापक डॉ. नितीन सनगर व अष्टपैलू राहुल भोसले यांनी ७ तास २ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण केली. गोवा येथे नुकतीच ही स्पर्धा झाली. आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन आशिया समितीच्या अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉनमध्ये जगभरातील ६८ देशांमधून तब्बल ३,५०० हून अधिक नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला. समुद्राच्या उसळत्या लाटांवर स्वार होत १.९ किमी खुल्या समुद्रात पोहणे, तीव्र चढ-उतारांच्या व खडतर मार्गांवर ९० किमी सायकलिंग आणि दमछाक करणाऱ्या किनारपट्टीच्या रस्त्यांवर २१.१ किमी अर्धमॅरेथॉन धावणे असे या स्पर्धेचे अतिशय कठीण स्वरूप होते. किंचितशीही चूक स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची भिती असते. या दोन्ही धाडसी खेळाडूंनी अचूक नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर हे सर्व अंतर ७ तास २ मिनिटांत पार पाडले.

डॉ. सनगर यांची ही चौथी ट्रायथलॉन होती. पण ७०.३ फॉरमॅटमधील तिसरी आणि अधिकृत 'आयर्नमॅन' म्हणून पहिलीच स्पर्धा ठरली. यापूर्वी त्यांनी सुपर रँडोनियर (२००, ३००, ४०० आणि ६०० किमी) सायकलिंगचे कठीण टप्पे पूर्ण केले आहेत. सलग तीन वर्षे ‘टाटा फुल मॅरेथॉन’ आणि सलग तीन वर्षे ‘सातारा हिल मॅरेथॉन’ यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. अलिकडेच त्यांनी सातारा हिल मॅरेथॉनमध्ये 'सब २' वेळेसह सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांना कोल्हापूर येथील 'अर्हता'चे पंकज राउळू यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले.

रत्नागिरीच्या राहुल भोसले यांनी यापूर्वी दुबईच्या खोल समुद्रातील १० किमी ओशन मॅन ओपन वॉटर स्विमिंग, लोह पुरुष, मालवण येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा यांसह अनेक मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गोवा आयर्नमॅन ७०.३ च्या तयारीसाठी त्यांनी डॉ. नितीन सनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला होता. शारीरिक आणि मानसिक क्षमतेची पराकाष्ठा पाहणाऱ्या या जागतिक दर्जाच्या महाकठीण स्पर्धेत यश मिळवून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल डॉ. सनगर आणि भोसले यांच्यावर क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


ताजी बातमी

View all

Ashpak Mulani Murder Case : खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर
November 04, 2026
पीक विम्यासाठी एक गुंठ्याची अट शिथिल करण्याची वेंगुर्ला पं. स. सभेत ठराव
November 04, 2026
दुष्काळामुळे पाणी वाचवण्यासाठी कुडाळ शहरातील कारंजे बंद ठेवण्याचा निर्णय
November 04, 2026
Traditional Konkani poha being prepared at a rice mill in Sindhudurg ahead of Diwali amid reduced paddy production.
Sindhudurg Poha : सिंधुदुर्गात भात उत्पादन घटल्याने गावठी पोहे महागणार
November 04, 2026
संबंधित बातम्या

View all

Mumbai Suburban men's and women's teams celebrate their victories at the Mumbai University Inter-Zonal Kabaddi Championship in Ratnagiri.
मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत मुंबई सबर्बनची महिला, पुरुषांच्या गटात बाजी
November 04, 2026
India vs New Zealand 1st ODI – Virat Kohli scores 74 runs in India's 5-wicket victory at Auckland.
पावसाच्या व्यत्ययानंतर भारताचा न्यूझीलंडवर ५ विकेट्सने दणदणीत विजय, विराट कोहलीची ७४ धावांची खेळी
November 04, 2026
Virat Kohli Rohit Sharma and Shubman Gill receive special All Blacks black jerseys from Keven Mealamu
ईडन पार्कवर भारतीय संघाच्या 'या' तिन्ही स्टार खेळाडूंचा सन्मान; रग्बी दिग्गजाकडून मिळाली खास 'ब्लॅक जर्सी' भेट
November 04, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
आस्था लोंढेची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
November 04, 2026