LIVE UPDATES

WPL 2027 : महिला प्रीमियर लीग २०२७ चे वेळापत्रक जाहीर

१४ जानेवारीपासून सामन्यांना सुरुवात : वडोदरा आणि मुंबईत रंगणार २२ सामने
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 01:59 PM
views 38  views
WPL 2027 Schedule

नवी दिल्ली : बीसीसीआयने बुधवारी २०२७ च्या महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर केले. डब्लूपीएलचा पाचवा हंगाम पुढील वर्षी १४ जानेवारीपासून सुरू होईल. पाच संघांच्या या स्पर्धेत एकूण २२ सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी ११ सामने वडोदरामध्ये आणि ११ सामने मुंबईत होतील. स्पर्धेचा पहिला सामना वडोदरा येथे गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होईल. सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होतील.

वडोदरामध्ये २४ जानेवारीपर्यंत सामने

२४ जानेवारीपर्यंतचे सामने वडोदरामध्ये होतील. त्यानंतर २६ जानेवारीपासून सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवले जातील. एलिमिनेटर सामना ५ फेब्रुवारीला तर अंतिम सामना २७ फेब्रुवारीला मुंबईत खेळवला जाईल. गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले होते. मुंबई इंडियन्सनेही आतापर्यंत दोनदा  महिला प्रीमियर लीगची ट्रॉफी जिंकली आहे. 

दिल्ली कॅपिटल्स गेल्या चारही हंगामांत अंतिम फेरीपर्यंत पोहोचले असले तरी त्यांना अद्याप विजेतेपद मिळवता आलेले नाही. दिल्ली कॅपिटल्स आपल्या आगामी हंगामाची सुरुवात १६ जानेवारीला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्याने करतील.

महिला प्रीमियर लीग 2027 चे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

गुरुवार, 14 जानेवारी 2027: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा

शुक्रवार, 15 जानेवारी 2027: गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, वडोदरा

शनिवार, 16 जानेवारी 2027: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, वडोदरा

रविवार, 17 जानेवारी 2027: यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा

सोमवार, 18 जानेवारी 2027: गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा

मंगळवार, 19 जानेवारी 2027: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स, वडोदरा

बुधवार, 20 जानेवारी 2027: गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा

गुरुवार, 21 जानेवारी 2027: यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा

शुक्रवार, 22 जानेवारी 2027: गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, वडोदरा

शनिवार, 23 जानेवारी 2027: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वडोदरा

रविवार, 24 जानेवारी 2027: यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, वडोदरा

मंगळवार, 26 जानेवारी 2027: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई

बुधवार, 27 जानेवारी 2027: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, मुंबई

गुरुवार, 28 जानेवारी 2027: मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, मुंबई

शुक्रवार, 29 जानेवारी 2027: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

शनिवार, 30 जानेवारी 2027: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, मुंबई

रविवार, 31 जानेवारी 2027: यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई

सोमवार, १ फेब्रुवारी २०२७ - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई

मंगळवार, २ फेब्रुवारी २०२७ - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स, मुंबई

बुधवार, ३ फेब्रुवारी २०२७ - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, मुंबई

शुक्रवार, ५ फेब्रुवारी २०२७ - एलिमिनेटर, मुंबई

रविवार, ७ फेब्रुवारी २०२७ - अंतिम सामना, मुंबई


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : 'द बॉबीन डिझाईनर स्टुडिओ'चा सावंतवाडीत शुभारंभ
November 05, 2026
Fly91 daily flight service between Sindhudurg Chipi Airport and Navi Mumbai starting November 16, 2026.
Sindhudurg to Navi Mumbai Flight : सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू
November 05, 2026
दशावतार ही कोकणची शान, कोकणसादने या कलेला जागतिक व्यासपीठ दिले
November 05, 2026
MLA Nilesh Rane meets villagers protesting over the Pazar lake issue in Kudal and directs authorities to stop the developer's work.
ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत विकासकाचे काम थांबवण्याचे आदेश
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

Mumbai Suburban men's and women's teams celebrate their victories at the Mumbai University Inter-Zonal Kabaddi Championship in Ratnagiri.
मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेत मुंबई सबर्बनची महिला, पुरुषांच्या गटात बाजी
November 04, 2026
Ratnagiri athletes Dr Nitin Sangaonkar and Rahul Bhosale successfully complete the Goa Ironman 70.3 Triathlon in 7 hours and 2 minutes.
Goa Ironman 70.3 : गोवा आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉनमध्ये रत्नागिरीच्या दोन शिलेदारांची बाजी
November 04, 2026
India vs New Zealand 1st ODI – Virat Kohli scores 74 runs in India's 5-wicket victory at Auckland.
पावसाच्या व्यत्ययानंतर भारताचा न्यूझीलंडवर ५ विकेट्सने दणदणीत विजय, विराट कोहलीची ७४ धावांची खेळी
November 04, 2026
Virat Kohli Rohit Sharma and Shubman Gill receive special All Blacks black jerseys from Keven Mealamu
ईडन पार्कवर भारतीय संघाच्या 'या' तिन्ही स्टार खेळाडूंचा सन्मान; रग्बी दिग्गजाकडून मिळाली खास 'ब्लॅक जर्सी' भेट
November 04, 2026