
नवी दिल्ली : एका शेतकरी कुटुंबातील साधेपणा आणि संघर्षाच्या वातावरणात लहानाचे मोठे झालेले ३१ वर्षीय जयपाल मालवीय यांनी आपल्या कठोर परिश्रमातून आणि नेमबाजीच्या कौशल्यातून २०२८ च्या ऑलिम्पिक खेळांसाठी भारताला पहिला कोटा मिळवून दिला आहे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील एका छोट्या गावापासून दोहामधील 'आयएसएसएफ' विश्व चॅम्पियनशिपपर्यंतचा त्यांचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखाच प्रेरणादायी आहे. ऑलिम्पिक कोटा मिळवला असला तरी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना अद्याप निवड चाचण्यांमध्ये आपली क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. पिढ्यानपिढ्या देवदेवतांच्या मूर्ती घडवणाऱ्या कुटुंबातून आलेल्या मालवीय यांनी आपल्या स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर देशाच्या क्रीडा इतिहासात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
२०२२ मध्ये जयपाल मालवीय यांनी एक जुनी पिस्तूल विकत घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा पैशांची कमतरता त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान बनली होती. अशा वेळी त्यांच्या गावातील मित्रांनी मदतीचा हात पुढे करत त्यांना सुमारे एक लाख रुपये दिले.
मालवीय सांगतात, "मी माझ्या मित्रांकडून पैसे उसने घेतले होते. माझे नशीब चांगले होते की त्यांनी मला मदत केली. त्याच जुन्या पिस्तूलच्या आधारे मी दोहामध्ये स्पर्धा केली व रौप्य पदक जिंकले आणि भारतासाठी ऑलिम्पिक कोटा मिळवला." त्यांना या वर्षी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळाली.
जुलै महिन्यात चीनमधील हांगझू येथे झालेला विश्वचषक हा त्यांचा पहिला परदेश प्रवास आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदार्पण ठरले. त्यांनी अव्वल आठ नेमबाजांमध्ये स्थान मिळवले होते तरी त्यांची नोंदणी केवळ 'रँकिंग पॉइंट्स ओन्ली' श्रेणीत झाली होती यामुळे त्यांना अंतिम फेरीत सहभागी होता आले नाही.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








