
सावंतवाडी : कोलगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोलगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा स्नेहमेळावा रविवारी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कोलगाव माध्यमिक विद्यालय, कोलगाव येथे होणार आहे. “आठवणींना उजाळा... पुन्हा एकदा शाळेच्या अंगणात” या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेच्या अंगणात एकत्र आणत जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात दीपप्रज्वलन, प्रार्थना, फोटोला अभिवादन व शाब्दिक स्वागत, श्रद्धांजली आणि प्रास्ताविकानंतर शिक्षकांचा स्वागत व सत्कार समारंभ होणार आहे. त्यानंतर माजी विद्यार्थी प्रतिनिधींचे स्वागत, माजी शिक्षकांचे मनोगत, माजी विद्यार्थ्यांचे मनोगत, आजी शिक्षकांचे मनोगत तसेच संस्थाचालकांचे मनोगत असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन, वंदे मातरम् आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य असून, सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








