LIVE UPDATES

Kulgam Terror Attack : सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला

कुलगाममध्ये गोळीबारात तीन जवान जखमी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 03:20 PM
views 53  views
CRPF jawans deployed in Kulgam after terrorist attack in Jammu and Kashmir.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे बुधवारी दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. यामध्ये तीन जवान जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था एएनआयनुसार, बुधवारी दुपारी कुलगाम जिल्ह्यात एका तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात तीन जवान जखमी झाले. ही घटना दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली.

अज्ञात हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते आणि गोळीबार केल्यानंतर तेथून पळून गेले. जखमी जवानांना अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर त्वरित सील करण्यात आला. लष्कर आणि पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून त्यांना पकडण्यासाठी आसपासच्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.


ताजी बातमी

View all

Incomplete road construction work on the Tilari to Vijghar road in Dodamarg, Sindhudurg.
तिलारी-विजघर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात गुरूवारी रास्ता रोको आंदोलन
November 11, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
तुमचा व्यवसाय, आमचा सपोर्ट EXPLORE KONKAN
November 11, 2026
Air India aircraft moved to isolation bay after hijack threat note found on Kolkata-Mumbai flight.
Air India Flight Hijack Threat : एअर इंडियाच्या विमानात खळबळ! वॉशरूममध्ये सापडली अपहरणाच्या धमकीची चिठ्ठी
November 11, 2026
India U19 vs Afghanistan U19 and Pakistan U19 vs Bangladesh U19 semifinal matches in U19 Asia Cup 2026.
भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? अंडर-19 आशिया कपच्या फायनलचे समीकरण जाणून घ्या
November 11, 2026
संबंधित बातम्या

View all

Air India aircraft moved to isolation bay after hijack threat note found on Kolkata-Mumbai flight.
Air India Flight Hijack Threat : एअर इंडियाच्या विमानात खळबळ! वॉशरूममध्ये सापडली अपहरणाच्या धमकीची चिठ्ठी
November 11, 2026
IIT Delhi launches six-month AI and Cyber Security certificate course for working professionals.
नोकरीसोबत एआय, सायबर सुरक्षेचे शिक्षण घेण्याची संधी! ६ महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स, जाणून घ्या सविस्तर
November 06, 2026
India's indigenous Pralay quasi-ballistic missile developed by DRDO
Pralay Missile Test : भारताची सामरिक ताकद वाढणार! डीआरडीओच्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
November 06, 2026
Kadamba Transport Corporation employees in Goa announce a 24-hour strike from November 12 over 18 pending demands.
Kadamba Transport Employees Strike : गोव्याच्या कदंब परिवहन कर्मचाऱ्यांचा १२ नोव्हेंबरपासून संपाचा इशारा
November 05, 2026