LIVE UPDATES

IND vs NZ 4th ODI : चौथ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल, असा आहे संभाव्य संघ

१९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करण्यासाठी कर्णधार शुभमन गिलसह अनेक भारतीय खेळाडूंनी शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 12:52 PM
views 70  views
India vs New Zealand 4th ODI probable playing XI with Shreyas Iyer, Ishan Kishan and Rohit Sharma

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी माउंट माउंगानुई येथील 'बे ओव्हल' मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात किमान तीन बदल होण्याची शक्यता आहे. 

१९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करण्यासाठी कर्णधार शुभमन गिलसह अनेक भारतीय खेळाडूंनी शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करेल. गिल तसेच के.एल. राहुल आणि अंशुल कंबोज देखील चौथ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नाहीत.

ईशान किशन चौथ्या एकदिवसीय सामन्यात नक्कीच खेळणार असून तो के.एल. राहुलच्या जागी यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. तो फलंदाजीला कोणत्या क्रमांकावर येईल हे अद्याप ठरलेले नाही. तो रोहित शर्मासोबत सलामीला येऊ शकतो किंवा मधल्या फळीला बळकटी देण्यासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. 

किशन कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करेल याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर घेतील. पहिल्या तीन सामन्यांत राखीव खेळाडू म्हणून बाहेर असलेल्या मोहम्मद सिराजला कसोटी मालिकेपूर्वी संधी दिली जाऊ शकते. त्याला पाचही एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात निवडण्यात आले होते.

तिलक वर्माला 'फिनिशर'च्या भूमिकेत संघात स्थान मिळू शकते. या मालिकेत के.एल. राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता तर संघ पाचव्या क्रमांकावर अक्षर पटेल याचा वापर करत होता. 

भारताचा संभाव्य संघ

रोहित शर्मा, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नमनधीर, अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, आकिब नबी, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग


ताजी बातमी

View all

Chiplun Municipal Council building
Chiplun News : चिपळूण नगरपालिका नवीन इमारतीचा 13 नोव्हेंबरला भूमिपूजन सोहळा
November 12, 2026
Konkan Folk Art Festival 2027 to showcase traditional folk dances and cultural heritage in Chiplun
Konkan Folk Art Festival 2027 : कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर
November 12, 2026
Uday Samant visits Shri Mahalakshmi Mini Mall after massive fire in Ratnagiri
Ratnagiri Mall Fire : आगीमुळे नुकसानग्रस्त व्यावसायिकांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला धीर
November 12, 2026
कोलगाव विद्यालयात १५ नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

Indian shooter jaypal Malviya wins silver medal at ISSF World Championship in Doha and secures an Olympic quota for India.
जुन्या पिस्तुलाच्या जोरावर जयपाल मालवीय यांनी भारताला मिळवून दिला २०२८ ऑलिम्पिकचा पहिला कोटा
November 11, 2026
India U19 vs Afghanistan U19 and Pakistan U19 vs Bangladesh U19 semifinal matches in U19 Asia Cup 2026.
भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? अंडर-19 आशिया कपच्या फायनलचे समीकरण जाणून घ्या
November 11, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sawantwadi News : डॉ. रवि गोळघाटे यांची ‘आयर्नमॅन’ भरारी
November 09, 2026
कबड्डीपटूंची निवड गुणवत्तेच्या आधारेच होणार : ॲड. अजित गोगटे
November 07, 2026