LIVE UPDATES

स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई देशात अव्वल तर स्वच्छ किनारपट्टी शहरांच्या यादीत रत्नागिरीचा तिसरा क्रमांक

Swachh Survekshan Awards : बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विज्ञान भवन येथे 'स्वच्छ सर्वेक्षण' पुरस्कारांची घोषणा केली. त्यांनी स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध शहरांना पुरस्कार प्रदान केले.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 06:37 PM
views 126  views
President of India Droupadi Murmu

मुंबई : शहरांमधील स्वच्छतेसाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 'क्लीन सिटी लीग' कॅटेगरीमध्ये नवी मुंबईने प्रथम क्रमांक पटकावला असून सुरत दुसऱ्या आणि विजयवाडा तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. दरम्यान, १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या कॅटेगरीत ग्रेटर विशाखापट्टणम विजेते ठरले आहे. या कॅटेगरीत मध्य प्रदेशमधील जबलपूर दुसऱ्या क्रमांकावर, तर लखनौ तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या ताज्या सर्वेक्षणात एकूण ४,७५१ शहरांनी सहभाग घेतला होता. 

बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विज्ञान भवन येथे 'स्वच्छ सर्वेक्षण' पुरस्कारांची घोषणा केली. त्यांनी स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध शहरांना पुरस्कार प्रदान केले. नवी मुंबई, लखनौ आणि वाराणसी व्यतिरिक्त इतर अनेक शहरांनीही विविध श्रेणींमध्ये स्वच्छतेचे पुरस्कार जिंकले आहेत. नदीकाठी वसलेल्या शहरांच्या श्रेणीत रेवा प्रथम क्रमांकावर राहिले, तर बिलासपूर दुसऱ्या आणि वाराणसी तिसऱ्या स्थानावर आले.

किनारपट्टीवरील शहरांच्या श्रेणीत पुरी अव्वल ठरले. जगन्नाथ यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराने स्वच्छतेच्या क्षेत्रातही आपली क्षमता सिद्ध केली आहे. पुरीच्या पाठोपाठ केरळ येथील अलाप्पुझा दुसऱ्या क्रमांकावर, तर रत्नागिरी तिसऱ्या क्रमांकावर राहिले.


ताजी बातमी

View all

ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामाचा फटका
November 11, 2026
Cancer Medicines Price Cut in India : कर्करोगावरील १३७ औषधे स्वस्त
November 11, 2026
Wild elephant Omkar spotted in Hodawada village of Vengurla taluka in Sindhudurg district.
Omkar Elephant : ओंकार हत्तीची वेंगुर्ला तालुक्यात एंट्री
November 11, 2026
Freshly repainted statue of Shrimant Shivramraje Bhosale near Moti Lake in Sawantwadi.
Sawantwadi News : मोती तलावाकाठी श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याला विनामूल्य रंगरंगोटी
November 11, 2026
संबंधित बातम्या

View all

CRPF jawans deployed in Kulgam after terrorist attack in Jammu and Kashmir.
Kulgam Terror Attack : सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला
November 11, 2026
Air India aircraft moved to isolation bay after hijack threat note found on Kolkata-Mumbai flight.
Air India Flight Hijack Threat : एअर इंडियाच्या विमानात खळबळ! वॉशरूममध्ये सापडली अपहरणाच्या धमकीची चिठ्ठी
November 11, 2026
IIT Delhi launches six-month AI and Cyber Security certificate course for working professionals.
नोकरीसोबत एआय, सायबर सुरक्षेचे शिक्षण घेण्याची संधी! ६ महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स, जाणून घ्या सविस्तर
November 06, 2026
India's indigenous Pralay quasi-ballistic missile developed by DRDO
Pralay Missile Test : भारताची सामरिक ताकद वाढणार! डीआरडीओच्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
November 06, 2026