LIVE UPDATES

Konkan Folk Art Festival 2027 : कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर

लोककलेच्या संवर्धनासाठी १६ व १७ जानेवारीला चिपळूणमध्ये भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 01:50 PM
views 35  views
Konkan Folk Art Festival 2027 to showcase traditional folk dances and cultural heritage in Chiplun

चिपळूण : निसर्गसौंदर्याबरोबरच समृद्ध लोककला, लोकपरंपरा, लोकसंगीत आणि सांस्कृतिक वैभवाची शिदोरी लाभलेल्या कोकणच्या अस्सल सांस्कृतिक वारशाला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने एक्सप्लोर कोकण, कोकण रिपोर्टर आणि व्हिजन थ्री न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकण लोककला महोत्सव २०२७’चे आयोजन करण्यात आले आहे. १६ व १७ जानेवारी २०२७ रोजी चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हा दोन दिवसीय भव्य महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याची माहिती आयोजक सतीश कदम, मकरंद भागवत आणि राजेंद्रकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Konkan Folk Culture)

या महोत्सवासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांतील मंत्री महोदय, खासदार, आमदार, विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, नामवंत उद्योजक, व्यावसायिक तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे. कोकणच्या सांस्कृतिक वैभवाचा हा सोहळा सर्वांच्या सहभागातून अधिक व्यापक आणि भव्य व्हावा, हा यामागील उद्देश आहे.

कोकणच्या मातीत रुजलेल्या दशावतार, पालखी सोहळ्यातील पारंपरिक नृत्य, नकटा, संकासूर, जाखडी, कोळी नृत्य, चपई नृत्य, काटखेळे, वारली नृत्य, धनगरी गजा नृत्य, आदिवासी पारंपरिक नृत्य, कातकरी नृत्य अशा अनेक आकर्षक लोककला सादर होणार आहेत. या महोत्सवामध्ये विशेष आकर्षण म्हणजे “पद्मश्री” प्राप्त भिकल्या लाडक्या धिंडाबाबा हे स्वतः उपस्थित राहून प्रसिद्ध तारपा वाद्याचे सादरीकरण करणार आहेत. त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय कोकणवर आधारित स्थानिक कलाकारांचे आकर्षक नृत्य सादर करून अन्य पारंपरिक कलाप्रकारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता कोकणच्या लोकसंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीकडे तिचे हस्तांतरण करण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम ठरणार आहे. यावेळी लोककलेच्या क्षेत्रात आयुष्यभर योगदान देणाऱ्या ज्येष्ठ लोककलावंतांचा विशेष गौरव करून त्यांच्या कार्याचा सन्मानही करण्यात येणार आहे.

कोकणची लोककला ही केवळ मनोरंजनाची परंपरा नसून ती येथील लोकजीवन, श्रद्धा, इतिहास आणि सामाजिक संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात पारंपरिक लोककला मागे पडू नयेत, कलाकारांना योग्य सन्मान आणि व्यासपीठ मिळावे, तसेच नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांची ओळख व्हावी, या व्यापक भूमिकेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ‘कोकण लोककला महोत्सव २०२७’ हा केवळ दोन दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम नसून कोकणच्या मातीचा, परंपरेचा, लोककलावंतांच्या कलेचा आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचा उत्सव ठरणार आहे.

कोकणच्या लोककलेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याच्या दिशेने हा महोत्सव महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल असे सतीश कदम, मकरंद भागवत आणि राजेंद्रकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.


ताजी बातमी

View all

Chiplun Municipal Council building
Chiplun News : चिपळूण नगरपालिका नवीन इमारतीचा 13 नोव्हेंबरला भूमिपूजन सोहळा
November 12, 2026
Uday Samant visits Shri Mahalakshmi Mini Mall after massive fire in Ratnagiri
Ratnagiri Mall Fire : आगीमुळे नुकसानग्रस्त व्यावसायिकांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला धीर
November 12, 2026
कोलगाव विद्यालयात १५ नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
November 12, 2026
India vs New Zealand 4th ODI probable playing XI with Shreyas Iyer, Ishan Kishan and Rohit Sharma
IND vs NZ 4th ODI : चौथ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल, असा आहे संभाव्य संघ
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

Chiplun Municipal Council building
Chiplun News : चिपळूण नगरपालिका नवीन इमारतीचा 13 नोव्हेंबरला भूमिपूजन सोहळा
November 12, 2026
Uday Samant visits Shri Mahalakshmi Mini Mall after massive fire in Ratnagiri
Ratnagiri Mall Fire : आगीमुळे नुकसानग्रस्त व्यावसायिकांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला धीर
November 12, 2026
कोलगाव विद्यालयात १५ नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Oros Roads Condition News : जिल्हा मुख्यालयाच्या रस्त्यांचीच दुर्दशा
November 12, 2026