
देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या वतीने आयोजित किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेतून निवड होणाऱ्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. अजित गोगटे म्हणाले, खेळाडूंची निवड कोणाच्या ओळखीवर अथवा शिफारशीवर होणार नसून, त्यांच्या प्रत्यक्ष खेळातील कामगिरी आणि गुणवत्तेच्या आधारेच केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने मैदानावर आपले कौशल्य आणि गुणवत्ता सिद्ध करावी. मुलांचा आणि मुलींचा एक सक्षम जिल्हा संघ तयार होऊन परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सहकार्यवाह नितीन हडकर, खजिनदार मार्टीन अल्मेडा, सदस्य अजय जाधव, देवगड मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, भाजप शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, पडेल सरपंच भूषण पोकळे, पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरुल, वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नगरसेविका गौरी मराठे, देवगड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष धुरी, सरचिटणीस तथा नगरसेवक शरद ठुकरुल आणि जिल्हा पंचमंडळाचे अध्यक्ष प्रशांत वारीक आदी मान्यवर उपस्थित होते. या निवड चाचणी स्पर्धेतून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे गुणवंत कबड्डीपटू निवडले जाणार असल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








