LIVE UPDATES

भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? अंडर-19 आशिया कपच्या फायनलचे समीकरण जाणून घ्या

U19 Asia Cup 2026 : पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 'अल अमरात क्रिकेट ग्राउंड'वरील 'मिनिस्ट्री टर्फ १' वर खेळवला जाईल तर दुसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात त्याच वेळी 'टर्फ २'वर होईल.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 11, 2026 01:27 PM
views 84  views
India U19 vs Afghanistan U19 and Pakistan U19 vs Bangladesh U19 semifinal matches in U19 Asia Cup 2026.

नवी दिल्ली : अंडर 19 आशिया कप २०२६ सध्या ओमानमध्ये सुरू आहे. या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता. यापैकी चार संघ पुढे पोहोचले आहेत तर उर्वरित चार संघांचा प्रवास लीग टप्प्यानंतर संपला आहे. स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांमध्ये यूएई, नेपाळ, श्रीलंका आणि मलेशिया यांचा समावेश आहे. दुसरीकडे, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनी सेमी-फायनल प्रवेश केला आहे.

गट 'अ' मधून पाकिस्तान आणि भारत यांनी उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तर गट 'ब' मधून अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांनी अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवले आहे. उपांत्य फेरीची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की वेगवेगळ्या गटांतील संघ एकमेकांशी भिडतील. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही. त्याऐवजी, भारत अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल तर पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होईल. दोन्ही उपांत्य सामने गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.

पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 'अल अमरात क्रिकेट ग्राउंड'वरील 'मिनिस्ट्री टर्फ १' वर खेळवला जाईल तर दुसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात त्याच वेळी 'टर्फ २'वर होईल. जर पाकिस्तानने बांगलादेशला आणि भारताने अफगाणिस्तानला पराभूत केले, तर हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात एकमेकांसमोर येऊ शकतात.

अंडर 19 आशिया कप २०२६ चा अंतिम सामना एक दिवसाच्या विश्रांतीनंतर 'अल अमरात क्रिकेट ग्राउंड'वरील 'टर्फ २' वर खेळवला जाईल. उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामना हे सर्व सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होतील.


ताजी बातमी

View all

Incomplete road construction work on the Tilari to Vijghar road in Dodamarg, Sindhudurg.
तिलारी-विजघर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात गुरूवारी रास्ता रोको आंदोलन
November 11, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
तुमचा व्यवसाय, आमचा सपोर्ट EXPLORE KONKAN
November 11, 2026
CRPF jawans deployed in Kulgam after terrorist attack in Jammu and Kashmir.
Kulgam Terror Attack : सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला
November 11, 2026
Air India aircraft moved to isolation bay after hijack threat note found on Kolkata-Mumbai flight.
Air India Flight Hijack Threat : एअर इंडियाच्या विमानात खळबळ! वॉशरूममध्ये सापडली अपहरणाच्या धमकीची चिठ्ठी
November 11, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sawantwadi News : डॉ. रवि गोळघाटे यांची ‘आयर्नमॅन’ भरारी
November 09, 2026
कबड्डीपटूंची निवड गुणवत्तेच्या आधारेच होणार : ॲड. अजित गोगटे
November 07, 2026
India cricket team celebrates victory against New Zealand in the second ODI at Wellington under the DLS method.
भारताचा डीएलएस नियमानुसार ४ धावांनी विजय, मालिकेत २-० अशी आघाडी
November 07, 2026
India vs New Zealand second ODI match in Wellington with rain threat and predicted Indian playing XI.
दुसऱ्या वनडेवर पावसाचे सावट! सामना रद्द होण्याची शक्यता, आकाश चोप्रांच्या मते भारताची संभाव्य प्लेइंग ११
November 06, 2026