LIVE UPDATES

Sawantwadi News : डॉ. रवि गोळघाटे यांची ‘आयर्नमॅन’ भरारी

आयर्नमॅन 70.3 गोवा स्पर्धा ८ तास ४ मिनिटांत पूर्ण ; सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 09, 2026 12:18 PM
views 209  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सावंतवाडी : जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक  डॉ. रवि गोळघाटे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी गोवा येथे झालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची ‘आयर्नमॅन 70.3 गोवा’ ही अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच सावंतवाडी व सिंधुदुर्ग डॉक्टर फॅटरनिटी मधील प्रथम मानकरी ठरले आहेत.

विशेष म्हणजे, महाविद्यालयातील अध्यापनाची जबाबदारी, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, शैक्षणिक कामकाज आणि इतर व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी या स्पर्धेची तयारी केली. आपल्या व्यस्त दिनक्रमातून नियमित सरावासाठी वेळ काढत त्यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामागे वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि प्रबळ इच्छाशक्ती यांचा मोठा वाटा आहे.

आयर्नमॅन 70.3 ही स्पर्धा जागतिक स्तरावर अत्यंत कठीण मानली जाते. या स्पर्धेत सलग १.९ किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१.१ किलोमीटर धावणे अशी एकूण ११३ किलोमीटरची आव्हानात्मक शारीरिक परीक्षा असते.

डॉ. रवि गोळघाटे यांनी ही संपूर्ण स्पर्धा ८ तास ४ मिनिटे ३ सेकंदांत पूर्ण केली. विशेष म्हणजे, स्पर्धेची निर्धारित ८ तास ३० मिनिटांची वेळमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी यशस्वीरीत्या अंतिम रेषा गाठली.

त्यांची स्पर्धेतील कामगिरी पुढीलप्रमाणे :

पोहणे (१.९ किमी) : १ तास ५ मिनिटे ३ सेकंद

सायकलिंग (९० किमी) : ३ तास ३८ मिनिटे ३५ सेकंद

धावणे (२१.१ किमी) : २ तास ५८ मिनिटे ४१ सेकंद

एकूण वेळ : ८ तास ४ मिनिटे ३ सेकंद

या कामगिरीत त्यांनी ४० ते ४४ वयोगटात १३१ स्पर्धकांमधून १०१ वे स्थान, पुरुष गटात ९९३ स्पर्धकांमधून ७८४ वे स्थान, तर एकूण १,११४ स्पर्धकांमधून ८७१ वे स्थान मिळविले.

डॉ. रवि गोळघाटे यांच्या या यशाचे विशेष कौतुक होत आहे. कारण एकीकडे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडताना दुसरीकडे स्वतःच्या क्रीडाविषयक स्वप्नासाठी त्यांनी घेतलेली मेहनत निश्चितच प्रेरणादायी आहे.

त्यांच्या या यशामुळे भा. सा. आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी तसेच संपूर्ण परिसराचा गौरव वाढला आहे. त्यांच्या यशातून विद्यार्थी, तरुण आणि नोकरदार वर्गाला एक महत्त्वपूर्ण संदेश मिळतो की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी वय किंवा व्यस्त दिनक्रम अडथळा ठरत नाही; त्यासाठी आवश्यक असते ती जिद्द, नियोजन आणि सातत्य.

यापूर्वी  ही डॉ. रवि गोळघाटे यांनी गोवा रिव्हर मॅराथॉन ४२ किलोमीटर, टाटा मुंबई मॅराथॉन ४२ किलोमीटर, टाटा अल्टरा मॅराथॉन लोणावळान ५० किलोमीटर, गणपती पुळे अल्टरा मॅराथॉन ५६ किलोमीटर  व बर्गमैन ऑलिंपिक डिस्टेंस ट्रायथलॉन ओझर पुणे यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे.डॉ. रवि गोळघाटे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
अंशकालीन स्त्री परिचरांच्या खात्यात भाऊबीज अनुदान जमा होण्यास सुरुवात
November 09, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : कुणकेश्वर तळीवाडी पाड्यावर वंचित बांधवांसोबत भाजपची दिवाळी
November 09, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sawantwadi Maha Arogya Shibir : सावंतवाडीत १५ नोव्हेंबरला महाआरोग्य शिबिर
November 09, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kudal Dumping Ground Fire : कुडाळ डम्पिंग ग्राउंडला भीषण आग
November 09, 2026
संबंधित बातम्या

View all

कबड्डीपटूंची निवड गुणवत्तेच्या आधारेच होणार : ॲड. अजित गोगटे
November 07, 2026
India cricket team celebrates victory against New Zealand in the second ODI at Wellington under the DLS method.
भारताचा डीएलएस नियमानुसार ४ धावांनी विजय, मालिकेत २-० अशी आघाडी
November 07, 2026
India vs New Zealand second ODI match in Wellington with rain threat and predicted Indian playing XI.
दुसऱ्या वनडेवर पावसाचे सावट! सामना रद्द होण्याची शक्यता, आकाश चोप्रांच्या मते भारताची संभाव्य प्लेइंग ११
November 06, 2026
India vs Sri Lanka 2026 cricket series first ODI venue shifted from Delhi to Visakhapatnam.
India vs Sri Lanka 2026 Schedule : भारत-श्रीलंका मालिकेबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय! पहिल्या वनडे सामन्याचे ठिकाण बदलले
November 06, 2026