LIVE UPDATES

India U19 vs Afghanistan U19 : अंडर-१९ आशिया कपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

फायनलमध्ये भारताचा पाकिस्तानशी महामुकाबला : लक्ष्य रायचंदानीचे ९३ धावा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 06:07 PM
views 63  views
India U19 cricket team celebrates victory over Afghanistan in U19 Asia Cup 2026 semifinal

मुंबई : अंडर १९ पुरुष आशिया कप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तिथे त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. पाकिस्तानने पहिल्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव केला होता. ओमानमधील अल अमेरात क्रिकेट मैदानावर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ५० षटकांत ८ गडी गमावून २२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, लक्ष्य राजेश रायचंदानीच्या ९३ धावांच्या खेळीच्या आणि आर्यवीर सेहवागच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने अंतिम फेरी गाठली.

अंडर १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ८ बाद २२७ धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी नोमान सलारझाई आणि शाह फैसल रहमानी यांनी प्रत्येकी ५१ धावा केल्या, तर सोहेल खान ३६ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून इशानने तीन बळी घेतले. काव्या परेश पटेल आणि अर्जुन राजपूत यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

२२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आर्यवीर सेहवाग आणि लक्ष्य यांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला उत्कृष्ट सुरुवात करून दिली. आर्यवीर सेहवागने ५७ चेंडूंत ५१ धावा केल्या. यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानीने ९० चेंडूंत ९३ धावांची दमदार खेळी केली. तो शतकापासून थोडक्यात हुकला, पण त्याच्या खेळीत १३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. व्ही. के. विनीतनेही ६२ चेंडूंत ५७ धावांचे योगदान दिले, ज्यामध्ये चार चौकार आणि चार षटकार होते.

अंडर १९ भारतीय संघ

लक्ष राजेश रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, अर्जुन राजपूत, यशवर्धन चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), मनाल चौहान, मोहित उल्वा, आर्यन सावसानी, काव्या पटेल, इशान सूद

अंडर १९ अफगाणिस्तान संघ

आबिदुल्ला नादरजान, फरीदुल्ला एहसास, सुभान जखैल, नोमान सलारझाई (यष्टीरक्षक), शाह फैसल रहीमी, ताहिर सरवारी, अमीर हमझा, सोहेल खान (कर्णधार), मोहम्मद अली, बिलाल सलिमानखिल, नूर अली नियाझी


ताजी बातमी

View all

हिंदळे येथे २४ नोव्हेंबरला श्री कार्तिक स्वामी दर्शन योग यात्रा
November 12, 2026
Sindhudurg Zilla Parishad President Pramod Kamat announces meeting to address issues of 128 libraries
Sindhudurg News : सिंधुदुर्गातील १२८ ग्रंथालयांच्या समस्या मार्गी लागणार
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
पेशंट केअरटेकर उपलब्ध | Careism Home Health Care
November 12, 2026
New OTT movies and web series releasing on Netflix, JioHotstar, ZEE5 and Apple TV on November 13, 2026
शुक्रवारी ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका! रिलिज होणार 'हे' चित्रपट अन् वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

India vs New Zealand 4th ODI probable playing XI with Shreyas Iyer, Ishan Kishan and Rohit Sharma
IND vs NZ 4th ODI : चौथ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल, असा आहे संभाव्य संघ
November 12, 2026
Indian shooter jaypal Malviya wins silver medal at ISSF World Championship in Doha and secures an Olympic quota for India.
जुन्या पिस्तुलाच्या जोरावर जयपाल मालवीय यांनी भारताला मिळवून दिला २०२८ ऑलिम्पिकचा पहिला कोटा
November 11, 2026
India U19 vs Afghanistan U19 and Pakistan U19 vs Bangladesh U19 semifinal matches in U19 Asia Cup 2026.
भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? अंडर-19 आशिया कपच्या फायनलचे समीकरण जाणून घ्या
November 11, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sawantwadi News : डॉ. रवि गोळघाटे यांची ‘आयर्नमॅन’ भरारी
November 09, 2026