
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० सिरिजमधील शेवटच्या सामन्यात रविवारी १ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. याआधी, चौथ्या सामन्यातही यजमान न्यूझीलंडकडून भारताला मोठा पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, सुरुवातीचे तीन सामने जिंकल्यामुळे भारताने ही सिरिज आपल्या नावावर केली. भारताने ही सिरिज ३-२ अशा फरकाने संपली.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली शेवटचे दोन सामने गमावल्यामुळे भारतीय संघाला सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या शेवटच्या दोन सामन्यांमधील खराब कामगिरीमुळे भारतीय संघ ट्रोल होत असला तरी आकाश चोप्रा यांचे मत वेगळे आहे.
त्यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवर लिहिले की "आमच्या फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या नाहीत. आमच्या गोलंदाजांनी सर्वाधिक बळी घेतले नाहीत. आमच्या फलंदाजांचा स्ट्राईक रेट चांगला नव्हता आणि आमच्या गोलंदाजांचा इकॉनॉमी रेटही चांगला नव्हता. तरीही सिरिज आपलीच आहे आणि हीच एकमेव आकडेवारी आहे जी महत्त्वाची ठरते."
Na Highest Runs hamare batter ke… Na highest wickets hamare bowler ke… Na highest strike-rate hamare batter ka.. Na best economy hamare bowler ka… But series hamari hai. And that’s the only stat that matters 😍 #IndvNZ
— Aakash Chopra (@cricketaakash) November 1, 2026
भारतीय संघाने टी-२० सिरिज ३-२ अशी जिंकली असली परंतु सर्वाधिक धावा न्यूझीलंडच्या फलंदाजाने केल्या आणि सर्वाधिक बळी न्यूझीलंडच्या गोलंदाजाने घेतले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सर्वाधिक अर्धशतके, तसेच सर्वाधिक चौकार आणि षटकारही नोंदवले.
इतकेच नव्हे, तर सर्वोत्तम इकॉनॉमी रेट आणि सर्वोत्तम गोलंदाजी सरासरीही न्यूझीलंडच्याच गोलंदाजाची होती. भारताने सुरुवातीचे तीन सामने जिंकून आधीच विजयी आघाडी घेतल्याने वैयक्तिक आणि सांख्यिकीय बाबींमध्ये सरस असूनही न्यूझीलंडला सिरिज जिंकता आली नाही.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








