LIVE UPDATES

Sports News : जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत आराध्या गावडे प्रथम

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 03:42 PM
views 32  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीची विद्यार्थिनी आराध्या गावडे हिने उल्लेखनीय यश संपादन केले.

आराध्याने १४ वर्षांखालील मुलींच्या वयोगटातील ४२ ते ४६ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

आराध्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर, क्रीडाशिक्षक भूषण परब तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी तिचे अभिनंदन केले.तसेच आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Vengurla News : ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रा’ ठरणार जनचळवळ
November 02, 2026
Police and bomb detection squad conduct a security check at Rajapur Civil Court in Ratnagiri following a bomb threat email.
Rajapur Court Bomb Threat : रत्नागिरी, सिंधुदुर्ग पाठोपाठ राजापूर न्यायालयालाही बॉम्बची धमकी
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi Railway Station : रेल्वे स्थानकावरील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg District Court : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

India vs New Zealand T20 Series 2026, Aakash Chopra reacts to India's 3-2 series win
भारताने सिरिज जिंकली, तरी आकडेवारीत न्यूझीलंड सरस! आकाश चोप्रांनी ट्रोलिंगवर दिले सडेतोड उत्तर
November 02, 2026
Manisha Bhanwala Celebrates Gold Medal Victory at World Wrestling Championship
Manisha Bhanwala : जागतिक कुस्ती स्पर्धेत मनीषा भानवालाचा ऐतिहासिक पराक्रम
October 31, 2026
India vs New Zealand 5th T20 Match Team India and New Zealand Cricket Teams
India vs New Zealand 5th T20 Match : रविवारी भारत-न्यूझीलंडमध्ये पाचवा टी-२० सामना
October 31, 2026
Aqib Nabi Added to India's ODI Squad for New Zealand Series by BCCI
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात बदल, 'या' गोलंदाजाला संधी
October 31, 2026