LIVE UPDATES

Vadshet-Wave Dam : वडशेत-वावे धरणाचा २५ वर्षांचा पाण्याचा वनवास संपणार

१४० कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 10:40 AM
views 45  views
#kokansadlive#news update#konkan update#

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तालुक्यातील बहुप्रतीक्षित वडशेत-वावे धरण प्रकल्पासाठी शासनाकडून तब्बल १४० कोटी ७० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला चालना मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रशासकीय मान्यतेचे अधिकृत पत्र नुकतेच सुतारवाडी येथील निवासस्थानी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना सुपूर्द करण्यात आले. अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे ३३५ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता होऊन शेती उत्पादनाला हातभार लागणार आहे. तसेच वडशेत, वावे, साखरोणे, जावेळे आणि धारवली यांसह पंचक्रोशीतील सुमारे आठ ते दहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, धरणाच्या कामाला सुरुवात करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या आणि संभाव्य नुकसान यांची योग्य दखल घेऊनच काम केले जाईल, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी दिली.या प्रसंगी हरिश्चंद्र मळेकर, रोशन मोरे, प्रफुल कासरुंग यांच्यासह अनेक मान्यवर, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

वडशेत-वावे धरण प्रकल्पाला मिळालेल्या या प्रशासकीय मान्यतेमुळे गेल्या सुमारे २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर तोडगा निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने संपूर्ण परिसराला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.


ताजी बातमी

View all

Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026
OTT Releases This Week November 2 to 8 on Netflix JioHotstar ZEE5 and SonyLIV
नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, सोनीलिव्ह अन् झी 5 वर मनोरंजनाचा धमाका! २ ते ८ नोव्हेंबरदरम्यान रिलीज होणार चित्रपट, वेब सीरिज
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : फूल विक्रेत्यांसाठी लवकरच स्वच्छतागृहाची सुविधा
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : फूल विक्रेत्यांसाठी लवकरच स्वच्छतागृहाची सुविधा
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#Omkar The Elephant
Omkar Elephant : थेट घरात सोंड घालून भात खाण्याचा प्रयत्न
November 02, 2026