LIVE UPDATES

Chiplun Traders' Federation : शेतकऱ्यांसाठी दुष्काळ, मग व्यापाऱ्यांसाठी काय ?

चिपळूण व्यापारी महासंघटनेचा शासनाला सवाल
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 02, 2026 12:11 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#

चिपळूण : दुष्काळजन्य परिस्थिती, आर्थिक मंदी, ऑनलाइन खरेदीचे वाढते प्रमाण, वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि परप्रांतीय फिरत्या विक्रेत्यांमुळे चिपळूणच्या स्थानिक बाजारपेठेतील व्यापारावर परिणाम होत असल्याची चिंता चिपळूण व्यापारी महासंघटनेने व्यक्त केली आहे. गेल्या ६ ते ८ वर्षांत बाजारपेठेची उलाढाल कमालीची घसरल्याचे सांगत, स्थानिक व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. 

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठेत पुन्हा एकदा उत्साह निर्माण व्हावा आणि ग्राहकांनी अधिकृत स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करावी, या उद्देशाने चिपळूण व्यापारी महासंघटनेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत चिपळूण बाजारपेठेतील विविध ठिकाणी आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, त्याद्वारे ग्राहकांचे स्वागत करत स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्यापारी महासंघटनेच्या म्हणण्यानुसार, वाढते कर, घरपट्टी, वीजबिले, जीएसटी, सीजीएसटी, आयकर, परवाना नूतनीकरणाचा खर्च आणि बँक कर्जाचे हप्ते अशा आर्थिक जबाबदाऱ्या व्यापाऱ्यांना नियमितपणे पार पाडाव्या लागतात. मात्र, दुसरीकडे ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता कमी होत असून, ऑन‌लाइन खरेदीच्या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक व्यापाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन दुष्काळ जाहीर केला, त्याप्रमाणे कष्टकरी व्यापाऱ्यांचाही विचार करावा, अशा भावना व्यापारी महासंघटनेने व्यक्त केल्या आहेत. शेतकरी जगला पाहिजे, त्याचप्रमाणे व्यापारीही जगला पाहिजे. व्यापाऱ्यांनाही कुटुंब, कर्ज आणि मूलभूत गरजांची जबाबदारी आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला विविध करांमध्ये सवलत किंवा शिथिलता देण्याबाबत शासनाने संकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


ताजी बातमी

View all

Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026
OTT Releases This Week November 2 to 8 on Netflix JioHotstar ZEE5 and SonyLIV
नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, सोनीलिव्ह अन् झी 5 वर मनोरंजनाचा धमाका! २ ते ८ नोव्हेंबरदरम्यान रिलीज होणार चित्रपट, वेब सीरिज
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : फूल विक्रेत्यांसाठी लवकरच स्वच्छतागृहाची सुविधा
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

Konkan Agriculture University issues mango and cashew crop protection advisory for Ratnagiri farmers after unseasonal rainfall.
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg News : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनावे : प्रकाश मोरे
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sawantwadi News : फूल विक्रेत्यांसाठी लवकरच स्वच्छतागृहाची सुविधा
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#Omkar The Elephant
Omkar Elephant : थेट घरात सोंड घालून भात खाण्याचा प्रयत्न
November 02, 2026