
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा अज्ञात व्यक्तीचा ई-मेल प्राप्त झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर न्यायालय प्रशासन आणि पोलिस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व न्यायाधीशांसह न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने न्यायालयाबाहेर काढण्यात आले. मात्र , न्यायालय परिसरात बॉम्ब आढळून न आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
धमकीच्या ई-मेलनंतर न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. संपूर्ण न्यायालय परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी आणि आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.या घटनेमुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला आणि त्यामागील उद्देश काय, याबाबत तपास यंत्रणा माहिती घेत आहेत.दरम्यान, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर न्यायालय परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








