
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वेगाडी 3 सप्टेंबरपासून धावणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३ सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवून ही एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी मार्गस्थ होणार आहे. यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना नवा थेट आणि सोयिस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.
नवीन दैनिक एक्स्प्रेसच्या सेवेमुळे मुंबई, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान दैनिक एक्सप्रेस गाडी क्रमांक १५०८७ आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दरम्यान दररोज धावणार आहे.
'या' स्थानकांवर थांबा
व्यापारी, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे नागरिक आणि स्थानिक हजारो प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी तसेच कोकणात येण्यासाठी दैनिक एक्सप्रेसचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरदा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










