LIVE UPDATES

वेंगुर्ले, तुळस, सावंतवाडा-अणसुर मार्गे सावंतवाडी बस सेवा सुरू

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 02, 2026 19:53 PM
views 164  views

वेंगुर्ले : तुळस सावंतवाडा, अणसुर या भागातील प्रवासी नागरीकांची अनेक वर्षांची मागणी असलेली वेंगुर्ले-अणसुर-मडकेलवाडी-सावंतवाडा-जकातनाका मार्गे सावंतवाडी ही एस.टी. बससेवा मंगळवार दि. १ सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. ही बससेवा सुरु करुन एस.टी. विभागाने प्रवाश्यांची गैरसोय दूर केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या बससेवेचा शुभारंभ माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत सुभाष सावंत, अरुण सावंत, किशोर सावंत, रामचंद्र सावंत, यशवंत सावंत, बाबाजी सावंत, अक्षता सावंत, विजय सावंत, किरण ठोंबरे, नेत्रा सावंत, विद्या आंगचेकर, जागृती सावंत, सोनिया सावंत, आनंदी सावंत, चंद्रकला सावंत, सुखांती सावंत, दिव्या सावंत तसेच अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सदरची बससेवा सुरू करण्यासाठी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, तुळस-सावंतवाडाचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष सावंत, रामचंद्र सावंत, अरूण सावंत, पंचायत समिती सभापती शंकर घारे, जि.प. सदस्या सुजाता पडवळ, तुळस ग्रामपंचायत सरपंच रश्मी परब, उपसरपंच नारायण कुंभार, ग्रामस्थ किरण ठोंबरे, मुंबई मंडळ, गाव मंडळ व उत्कर्ष मंडळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.