LIVE UPDATES

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

Edited by: विनायक गांवस
Published on: June 06, 2026 16:09 PM
views 46  views

सावंतवाडी : येथील नामांकित 'संस्कार नॅशनल स्कूल' मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साही आणि भव्य वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून गुजरात येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व ‘तेजतारा’ संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक दर्शना दोमाडिया तसेच प्रा. कक्षा दोमडीया फाउंडेशनचे संचालक तसेच  संस्कार नॅशनल स्कूल चेअरमन शेखर जैन , शिक्षिका राधिका फणशीकर, अजय  बांदेकर, ओम नाईक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. 

आपल्या मार्गदर्शनात प्रा. दर्शना दोमाडिया यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत खेळाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्कार नॅशनल स्कूलचे चेअरमन यांनी भूषवले. याप्रसंगी विद्यालयाच्या शिक्षिका राधिका फणशीकर, शिक्षक अजय बांदेकर, ओम नाईक यांसह शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला असून, पहिल्याच दिवशी सामन्यांचा थरार पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी आणि प्रेक्षक वर्गाने मोठी गर्दी केली होती. मैदानावर खेळाडूंमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत असून, दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले जात आहे.

विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, तर शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या व्हॉलीबॉल स्पर्धेमुळे निरवडे आणि परिसरातील क्रीडा वातावरणात मोठी आनंदाची लाट पसरली आहे.