LIVE UPDATES

कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 26, 2026 17:54 PM
views 33  views

कणकवली : क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुका शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभा कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या दालनात नायब तहसीलदार मुकुंद मंडले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सचिन तांबे, कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड, माजी समन्वयक तथा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष बयाजी बुराण, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक संजय सावळ, टि.जी.पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. आरंभी मान्यवरांचे स्वागत दत्तात्रय मारकड यांनी केले. 

क्रीडा स्पर्धा वेळापत्रक :  कुस्ती- ६ आॅगस्ट -फोंडाघाट ज्यूदो क्लब, तायक्वांडो-८आॅगस्ट -कणकवली,  बुध्दिबळ- ११आॅगस्ट-ल.गो.सामंत विद्यालय हरकुळ बुे,  कबड्डी -१,२व३ सप्टेंबर - नाथ पै.ज्ञान प्रबोधिनी करुळ, खो-खो-८ व ९ सप्टेंबर - तळेरे हायस्कूल, शालेय फुटबॉल-११ सप्टेंबर - सेंट उसुर्ला वरवडे,  व्हॉलीबॉल - २९ व ३० सप्टेंबर - कळसुली हायस्कूल,  कॅरम- माध्य,- ६ व ७ आक्टोंबर माध्य-विद्यामंदिर कनेडी, क्रिकेट -  १३ व १४ आक्टोंबर-  शिवमुद्रा क्रीडा अकादमी ओझरम फाटा, मैदानी स्पर्धा -१५,१६ व १७ आक्टोंबर - कासार्डे हायस्कूल. सभेचे अध्यक्ष  मुकुंद मंडले यांनी स्पर्धेला शुभेच्छा देत शिक्षक व खेळाडू यांच्या अडचणी,समस्या जाणून घेतल्या व याबाबत सकारात्मक विचार करून शासनस्तरावर योग्य ती उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले. कणकवली तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला तसेच खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांना कणकवलीचे तहसीलदार तथा या क्रीडा परिषदचे अध्यक्ष दीक्षांत देशपांडे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी क्रीडा शिक्षक,विविध एकविध संघटनेचे पदाधिकारी, कोच व राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. सूत्रसंचालन विषयतज्ज्ञ सचिन तांबे यांनी केले. आभार दत्तात्रय मारकड यांनी मानले.

राष्ट्रीय खेळाडू, पालक,कोच व क्रीडा शिक्षकांचा सन्मान

कणकवली तालुक्याचे नावलौकिक शालेय स्पधेर्तून राष्ट्रीयस्तरावर उंचावल्या बद्द्ल गुणवंत खेळाडूं ,तसेच त्यांचे पालक,कोच व क्रीडा शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन नायब तहसीलदार मुकुंद मंडले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तन्वी पारकर, कणकवली कॉलेज ( ज्यूदो राष्ट्रीय खेळाडू), दुर्वा पवार -पोदार इंटरनॅशनल स्कूल ( तायक्वांडो राष्ट्रीय खेळाडू), अक्सा शिरगावकर - इंटरनॅशनल स्कूल  (धनुर्विद्या राष्ट्रीय खेळाडू), प्रज्योती जाधव -कनेडी ज्यू.कॉलेज (तायक्वांडो राष्ट्रीय खेळाडू), ओवी बाईत व उन्मय शिरवलकर - दोघेही बी एन विजयकर इंटरनॅशनल स्कूल हुंबरठ ( दोघेही राष्ट्रीय तायक्वांडो खेळाडू) आदी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.