LIVE UPDATES

सावंतवाडीत घराच्या मागील बाजूची भिंत मध्यरात्री कोसळली

सुदैवाने टळली हानी : सभापती मोहिनी मडगावकर यांनी केली पाहणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 27, 2026 20:50 PM
views 27  views

सावंतवाडी : जि.प. शाळा क्रमांक ४ जवळील शिवराम उर्फ काका तेंडोलकर यांच्या घराच्या मागील बाजूची भिंत मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास कोसळली. सुदैवाने त्यांचे भाऊ हेमंत तेंडोलकर हे या दुर्घटनेत थोडक्यात बचावले. यानंतर नगरपरिषद अधिकाऱ्यांसह सभापती मोहिनी मडगावकर यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या मागील बाजूची भिंत कमकुवत झाली होती. मध्यरात्री अचानक ही भिंत रस्त्यावर कोसळली. ही घटना रात्री घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. हेमंत तेंडोलकर हे सुदैवाने यातून बचावले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मोहिनी मडगावकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज राऊळ उपस्थित होते. सौ. मडगाकवर यांनी यावेळी आवश्यक सुचना अधिकाऱ्यांना केल्या.