LIVE UPDATES

जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत कुणकेश्वर हायस्कूलची दमदार कामगिरी

तीन खेळाडू कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेसाठी पात्र
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 26, 2026 17:49 PM
views 35  views

देवगड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरस येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर, कुणकेश्वर (ता. देवगड) येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध वजनी गटांमध्ये पदकांची लयलूट केली. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत प्रशालेच्या नावलौकिकात भर घातली असून, तीन खेळाडूंनी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठीही पात्रता मिळविली आहे.

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात ३६ किलोखालील वजन गटात मानसी निलेश आंबेरकर हिने तृतीय क्रमांक, तर ४० किलोखालील वजन गटात संजना बापू सावंत हिने द्वितीय क्रमांक मिळविला.१७ वर्षांखालील मुलींच्या गटात ३६ किलोखालील वजन गटात निकिता रोहिदास भोगले हिने द्वितीय, तर शमिका नितीन घाडी हिने तृतीय क्रमांक पटकावला. ४० किलो वजनी गटात निधी गजेंद्र कदम हिने तृतीय क्रमांक मिळविला. ४४ किलो वजनी गटात गायत्री राजेंद्र धुवाळी हिने द्वितीय, तर वैदेही हेमंत वातकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. ४८ किलो वजनी गटात गार्गी गणेश बाईत हिने द्वितीय, तर मनाली प्रमोद घाडी हिने तृतीय क्रमांक पटकावला. ५२ किलो वजनी गटात आर्या विक्रांत जोईल व श्रेया प्रसाद चव्हाण या दोघींनी तृतीय क्रमांक मिळविला. 

५७ किलो वजनी गटात सृष्टी विश्वास मुंबरकर हिने प्रथम, तर सुहानी महेश लब्दे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. ६३ किलो वजनी गटात सुरक्षा योगेश शिंदे हिने द्वितीय, तर ७० किलो वजनी गटात मृण्मयी संतोष धुरी हिने तृतीय क्रमांक मिळविला.१९ वर्षांखालील मुलींच्या गटात ५२ किलोखालील वजन गटात प्रांजली उमेश नानेरकर हिने तृतीय क्रमांक, तर ५७ किलोखालील वजन गटात पूजा रवींद्र घाडी हिने द्वितीय क्रमांक मिळविला.१७ वर्षांखालील मुलांच्या गटात ४० किलोखालील वजन गटात जयेश शरद चव्हाण याने तृतीय क्रमांक, ५० किलोखालील वजन गटात सर्वेश सुहास नानेरकर याने तृतीय क्रमांक,५५ किलोखालील वजन गटात गणेश नारायण परब याने तृतीय क्रमांक, ६० किलो वजनी गटात सर्वेश रामदास तेली याने प्रथम क्रमांक, तर ६६ किलो वजनी गटात शिवम राजेंद्र गावकर याने तृतीय क्रमांक मिळविला.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात ४० किलोखालील वजन गटात सार्थक दिपक घाडी याने प्रथम क्रमांक, तर ३५ किलोखालील वजन गटात मंजुष रुपेश घाडी याने द्वितीय क्रमांक पटकावला.स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सार्थक दिपक घाडी, सृष्टी विश्वास मुंबरकर आणि सर्वेश रामदास तेली या प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. बाळासाहेब ढेरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करताना संस्था अध्यक्ष चंद्रकांत घाडी, प्रशाला मुख्याध्यापक संजय राणे, कुणकेश्वर केंदप्रमुख देवकी शिंदे आदी उपस्थित होते.