
देवगड : तालुक्यातील तोरसोळे राणेवाडी येथील अशोक अनंत सावंत यांच्या घराशेजारील गोठ्यातील वासरावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू मृत्यूमुखी पडले. ही घटना शनिवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. शनिवारी मध्यरात्री अशोक सावंत यांच्या गोठ्यातील सहा गुरांनी अचानक मोठमोठ्याने हंबरण्यास सुरुवात केली म्हणून अशोक सावंत यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता वासराच्या मानेवर बिबट्याने हल्ला चढवला होता. हातातील दांड्याने त्यांनी बिबट्याला हुसकावून लावले मात्र हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. यात सावंत याचं पाच हजारांचे नुकसान झाले आहे. गुरांवरील बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण आहे. वन विभागाने धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.










