
देवगड : देवगड मंडल भाजपाच्या वतीने ‘एक दिवा वंचितांसाठी, पाड्यावरची दिवाळी २०२६’ या उपक्रमांतर्गत कुणकेश्वर तळीवाडी येथील पाड्यावर वंचित बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि माजी आमदार अजित गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड मंडल भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पाड्याला भेट दिली.
यावेळी पाड्यावर दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तसेच उपस्थित वंचित बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांच्यासोबत सणाचा आनंद साजरा करण्यात आला.
या उपक्रमात तालुका सदाशिव भुजबळ, एकनाथ तेली,उपाध्यक्ष विजय वाळके, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








