
देवगड : जामसंडे हायस्कूलच्या क्रीडांगणावर गेल्या चार दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किशोर-किशोरी गट कबड्डी संघाचे सराव शिबिर सुरू आहे. या शिबिरात खेळाडूंची निवास, भोजन आणि अन्य आवश्यक व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली असून, जिल्ह्यात आजवर आयोजित करण्यात आलेल्या सराव शिबिरांपैकी हे शिबिर सर्वोत्तम असल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली.
या सराव शिबिरासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच माजी आमदार अॅड. अजित गोगटे, सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष राजा भुजबळ आणि सुभाष धुरी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. शिबिरादरम्यान प्रशिक्षकांनी खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
उत्तम नियोजन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल खेळाडूंनी पालकमंत्री नितेश राणे, अॅड. अजित गोगटे तसेच शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू म्हणून पालकमंत्री कसा असावा, तर तो नितेश राणे यांच्यासारखा असावा, अशा शब्दांत खेळाडूंनी पालकमंत्र्यांच्या सहकार्याचे कौतुक केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








