LIVE UPDATES

Asia Cup Rising Stars 2026 Semi Final : उपांत्य फेरीत भारत 'अ' संघाची श्रीलंका 'अ' संघाशी लढत

आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ : पाकिस्तान 'अ' बांगलादेश 'अ' विरुद्ध भिडणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 06:39 PM
views 194  views
India A, Pakistan A, Sri Lanka A and Bangladesh A teams qualify for the Asia Cup Rising Stars 2026 semi-finals in Doha.

नवी दिल्ली : कतारची राजधानी दोहा येथे सुरू असलेल्या 'आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६' स्पर्धेतील उपांत्य फेरीचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. 'गट अ' मधून अफगाणिस्तान 'अ' आणि हाँगकाँग चायना, तर 'गट ब' मधून नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती हे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. भारत 'अ', पाकिस्तान 'अ', श्रीलंका 'अ' आणि बांगलादेश 'अ' या चार संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

उपांत्य फेरीच्या वेळापत्रकानुसार, 'गट अ' मध्ये अव्वल स्थानी असलेला भारत 'अ' संघ श्रीलंका 'अ' संघाशी भिडणार आहे. दुसरीकडे, 'गट ब' मध्ये अव्वल स्थानी असलेला पाकिस्तान 'अ' संघ 'गट अ' मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेश 'अ' संघाशी सामना खेळेल. 

भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील उपांत्य सामना गुरुवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता होणार आहे, तर पाकिस्तान 'अ' आणि बांगलादेश 'अ' यांच्यातील सामना शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता खेळवला जाईल. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.


ताजी बातमी

View all

नेरूर देसाईवाडीत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
November 25, 2026
Smartphone cybersecurity awareness showing mobile phone protection against hackers, data theft and online banking fraud.
Smartphone Security Tips : फोन हॅक कसा होतो ?
November 25, 2026
‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत २०४७’ संकल्पनेतून संविधान दिन साजरा
November 25, 2026
देवगड किल्ला परिसरात गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा
November 25, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Sindhudurg News : बॉक्सिंग स्पर्धेत आर्य आवटीला कांस्य
November 24, 2026
India A celebrates its seven-wicket victory against UAE in the Rising Stars Asia Cup 2026
यूएईवर इंडियाचा दणदणीत विजय! ७ विकेट्सनी मात करत 'इंडिया ए'ची 'रायझिंग स्टार्स आशिया कप'च्या उपांत्य फेरीत धडक
November 24, 2026
Vaibhav Suryavanshi celebrates his record-breaking 28-ball century against UAE
वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रमी पराक्रम! अवघ्या ५२ चेंडूंमध्ये ठोकले द्विशतक; २८ चेंडूंत शतक झळकावत रचला इतिहास
November 24, 2026
Chiplun swimming competition 2026
चिपळूण नगरपरिषदेतर्फे २९ नोव्हेंबरला भव्य जलतरण स्पर्धा
November 24, 2026