
चिपळूण : चिपळूण नगरपरिषद आयोजित शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या माध्यमातून शहरातील शालेय, महाविद्यालयीन तसेच नगरपरिषद हद्दीतील रहिवासी मुला-मुलींसाठी भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता चिपळूण नगरपरिषदेच्या जलतरण तलावात ही स्पर्धा पार पडणार आहे.
या स्पर्धेत २५ मीटर आणि ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारांचा समावेश असून, मुलगे व मुलींसाठी स्वतंत्र वयोगटांत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सहा वर्षांखालील, ८ वर्षांखालील, १० वर्षांखालील, १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील आणि १८ वर्षांखालील अशा सात गटांत जलतरणपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.
लहान वयापासूनच मुलांमध्ये जलतरणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन मिळावे आणि स्थानिक जलतरणपटूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी उद्यान विभागप्रमुख श्री. प्रसाद साडविलकर यांच्याशी ९७७६४६१०९०७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच स्पर्धकांच्या नावनोंदणीसाठी श्री. प्रितम जाधव यांच्याशी ९५२७२२२३१२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चिपळूण नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे. चिपळूणमधील जलतरणप्रेमी आणि नवोदित खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








