
दोहा : मंगळवारी 'आशिया कप रायझिंग स्टार्स' स्पर्धेच्या ११ व्या सामन्यात 'इंडिया ए' संघाने संयुक्त अरब अमिराती संघाचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह 'इंडिया ए' संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारत 'अ' विरुद्ध युएई 'रायझिंग स्टार्स' आशिया कप सामन्यात मंगळवारी युएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना यूएईने ५० षटकांत ८ गडी गमावून २४९ धावा केल्या.
प्रत्युत्तरात, वैभव सूर्यवंशीने पहिल्या षटकापासूनच आक्रमक फटकेबाजी करत त्याने अवघ्या १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर २८ चेंडूंत सर्वात जलद शतक झळकावले आणि पुढे ५२ चेंडूंत द्विशतक पूर्ण करून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतकाचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याच्या २०४ धावांच्या खेळीच्या जोरावर 'इंडिया ए' संघाने केवळ १४.२ षटकांत विजयाचे लक्ष्य गाठले.
२५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, 'इंडिया ए' संघाला वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली अत्यंत आक्रमक सुरुवात मिळाली. अभिषेक आणि वैभव यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. वैभवने १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर अभिषेक ५ चेंडूंत १२ धावा करून बाद झाला. वैभव सूर्यवंशीने ५३ चेंडूंत २०४ धावा केल्या. यामध्ये २८ षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. प्रभसिमरनला ४ चेंडूंत केवळ ३ धावा करता आल्या. रिंकू सिंगने षटकार मारून संघाचा विजय निश्चित केला; तो १९ चेंडूंत २७ धावा करून नाबाद राहिला.
प्रथम फलंदाजी करताना यूएई संघाने ५० षटकांत ८ गडी गमावून २४९ धावा केल्या. हरप्रीत संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. हरप्रीतने १३० धावांचे योगदान दिले. भारतासाठी अर्शद खानने ४ बळी घेतले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकात त्यांनी अर्यांशची, तर सहाव्या षटकात अंशची विकेट गमावली.
शहादाद ४६ चेंडूंमध्ये २८ धावा करून बाद झाला, तर इथन डिसोझा ३७ चेंडूंमध्ये २५ धावा काढून शहाबाजच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. हरप्रीतने १२० चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. आलमला केवळ दोन धावा करता आल्या. हरप्रीत सिंग भाटियाने १४४ चेंडूंमध्ये १३० धावा केल्या, ज्यामध्ये १२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. इब्रारला खातेही उघडता आले नाही, तर जाहिदने ९ चेंडूंमध्ये सात धावा केल्या.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








