
सावंतवाडी : राजकारणाच्या रिंगणातील प्रतिस्पर्धी असणारे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर व भाजप युवा नेते विशाल परब सोनुर्ली येथे देवी माऊलीच्या दरबारी समोरासमोर आले.
यावेळी विशाल परब यांनी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना नमस्कार केला. यावेळी श्री. केसरकरांकडूनही त्यांना नमस्कार केला गेला. यानिमित्ताने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राजकीय नेत्यांकडून सावंतवाडीची संस्कृती जपताना बघयला मिळाली.
दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीच्या जत्रोत्सवाला आज प्रारंभ झाला आहे. भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा रंग परिसरात चढला असून माऊलीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर व भाजप युवा नेते विशाल परब हे देखील दर्शनासाठी उपस्थित होते.
गाभाऱ्यातून दर्शन घेऊन बाहेर पडत असताना व्यासपीठा जवळ हे दोन्ही नेते समोरासमोर आले. राजकीय वर्तुळात प्रतिस्पर्धी असणाऱ्या या नेत्यांनी यावेळी सावंतवाडीची संस्कृती जपली. विशाल परब यांनी श्री. केसरकर यांना नमस्कार करत वंदन केले. तर श्री. केसरकर यांना देखील समोरून प्रतिसाद दिला.
राजकीय क्षेत्रात एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन नेत्यांची जत्रोत्सवाच्या निमित्ताने समोरासमोर भेट झाली. मात्र, त्या क्षणी राजकीय पादत्राणे बाजूला ठेवत संस्कारांचे नाते जपले गेले. राजकारणात मतभेद असू शकतात, विचारांची लढाई असू शकते. मात्र, माणुसकीच्या नात्याला त्याची बाधा होऊ नये, हा संदेश या कृतीतून अधोरेखित झाला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








