
मुंबई : टाटा मोटर्सने भारतीय बाजारात 'एरिस' (Aeris) ही सेडान कार लॉन्च केली आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ५.२९ लाख रुपये निश्चित केली आहे. एरियसच्या बाहेरील रचनेत बदल करण्यात आले असून यामध्ये नवीन इंटीरियर फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजीचा (CNG) पर्याय देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यात स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज मिळतात.
'एरिस' (Aeris) या सेडान कारमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मात्र तिचा मुळ आकार तसाच ठेवण्यात आला आहे. कारच्या टेल लाईट्समध्ये टाटाने सुधारणा केल्या असून यात एलईडी (LED) हेडलॅम्प्सच्या वर 'डीआरएल' (DRL) पट्टी आणि बंपरमध्ये समाविष्ट केलेले एलईडी फॉग लॅम्प्स देण्यात आले आहेत.
एरिसमधील खास फिचर्स
'एरिस'च्या कॅबिनमध्ये १०.२४ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा समावेश आहे. तसेच, यामध्ये क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड सीट्स, इंटिग्रेटेड डॅशकॅम, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम आणि ३६० डिग्री कॅमेरा यांचा समावेश आहे.
इतर फिचर्समध्ये इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमस, पुश-बटण स्टार्ट आणि फॅब्रिक सीट अपहोल्स्ट्री यांचा समावेश आहे. ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये इतर व्हेरिंअंटप्रमाणे साध्या गिअर लिव्हरऐवजी 'रोटरी ड्राइव्ह सिलेक्टर' देण्यात आला आहे.
इंजिनची क्षमता
टाटा 'एरिस'मध्ये १.२ लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन ८४ बीएचपी पॉवर आणि ११३ एनएमचा टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ५ स्पीड मॅन्युअल किंवा ५ स्पीड ऑटो गिअरबॉक्सचा समावेश आहे. तर सीएनजी पर्यायामध्ये ड्युअल सिलेंडर सेटअप फॅक्टरी फिटेड सीएनजी कारमध्ये मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना कॉम्पॅक्ट सेडानमध्ये सीएनजी सह ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. यामध्ये १.२ लिटर इंजिन ७३ बीएचपीची पॉवर आणि ९६.५ एनएमचा टॉर्क देते.
टाटा 'एरिस' कारमध्ये नवीन अलॉय व्हील डिझाइन आणि जांभळ्या रंगाचा पर्याय देण्यात आला आहे. कारची चार मीटरपेक्षा कमी लांबी असल्यामुळे ही सेडान 'कॉम्पॅक्ट सेडान' कॅटेगरीत येते. ग्राहकांना ही कार दांडेली ड्रिझल, नायट्रो क्रिमसन, ड्युन ग्लो आणि प्युअर ग्रे या चार कलरमध्ये उपलब्ध असेल.
व्हेरिअंट्सच्या प्रकारानुसार किंमती
टाटा एरियसच्या स्मार्ट व्हेरिअंटच्या पेट्रोल एमटी/एएमटी व्हेरिअंटची किंमत 5.30 लाख रुपये तर सीएनजीची किंमत 6.30 लाख रुपये आहे.
प्यूरे व्हेरिअंटच्या पेट्रोल एमटी/एएमटी व्हेरिअंटची किंमत 6.15 लाख / 6.70 लाख रुपये तर सीएनजीची किंमत 7.15 लाख / 7.70 लाख रुपये आहे.
प्यूरे प्लस व्हेरिअंटच्या पेट्रोल एमटी/एएमटी व्हेरिअंटची किंमत 6.75 लाख / 7.30 लाख रुपये तर सीएनजीची किंमत 7.75 लाख / 8.30 लाख रुपये आहे.
क्रिएटीव्ह व्हेरिअंटच्या पेट्रोल एमटी/एएमटी व्हेरिअंटची किंमत 7.50 लाख / 8.05 लाख रुपये तर सीएनजीची किंमत 8.50 लाख / 9.05 लाख रुपये आहे.
अकॉम्प्लिशड व्हेरिअंटच्या पेट्रोल एमटी/एएमटी व्हेरिअंटची किंमत 8.20 लाख / 8.75 लाख रुपये तर सीएनजीची किंमत 9.20 लाख / 9.75 लाख रुपये आहे. या किमतींमध्ये शहरांनुसार बदल होऊ शकतात.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










